जोधपूर येथील ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशना’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले आकर्षणाचे केंद्र !

जिज्ञासूंना माहिती सांगतांना  सौ. राखी मोदी

जोधपूर (राजस्थान) – येथे ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशन २०२६’मध्ये सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला देश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी बांधवांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. राखी मोदी यांनी जिज्ञासूंना संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली, तसेच त्यांना बालसंस्कार वर्ग आणि सत्संग यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. या प्रदर्शनाच्या वेळी अनेक जिज्ञासू हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनले, तसेच त्यांनी मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याविषयी उपयुक्त असे अनेक ग्रंथ खरेदी केले.

या प्रदर्शनाला ‘अखिल भारतीय माहेश्वरी महासभे’चे अध्यक्ष श्री. संदीप काबरा आणि सरचिटणीस अजय काबरा यांचे सहकार्य मिळाले. महासभेचे माजी सभापती श्री. श्यामसुंदर सोनी, सुरेश राठी, उद्योजक श्री. रामानंदजी काबरा, उद्योगपती विष्णु बियाणी, श्री. सौरभ राठी आणि इतर मान्यवर यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

Leave a Comment