
पणजी, २५ जानेवारी (वार्ता.) : गोमंतक ही परशुरामभूमी आहे. या भूमीचा गायीशी थेट संबंध आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोवा राज्यातील एक विशेष गोष्ट मी सांगतो. येथे सनातनची शुद्ध अशी संस्था कार्यरत आहे, ती म्हणजे सनातन संस्था. मी गुरुदेव डॉ. आठवले (सनातन संस्थेचे संस्थापक) यांचे आशीर्वादही प्राप्त केले आहेत. ते पवित्र आत्मा आहेत !
Yogarishi Ramdev Baba praises @SanatanSanstha’s mission! 🔱
During his Goa visit, @yogrishiramdev expressed his deep appreciation for the Sanstha and shared his gratitude for the blessings of the “pure soul” Sachchidananda Parabrahman (Dr) Jayant Athavale#GoaNews… pic.twitter.com/XrgvokRQcp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 25, 2026
आपली वाणी, आहार, विचार, व्यवहार, स्वभाव या सगळ्यांत सनातन धर्म उतरला पाहिजे, यासाठी सनातन संस्था कार्य करत आहे. सनातन धर्माचे शाश्वत सिद्धांत केवळ एका वर्गापुरतेकिंवा एका जातीपुरते मर्यादित नाहीत. ते अखिल विश्वाच्या कल्याणासाठी आहेत. सनातन धर्मयुग प्रतिष्ठापित व्हावे, यासाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे, असे कौतुकोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे काढले.
पणजी येथे ‘इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेद अँड वेलनेस एक्स्पो अँड समिट २०२६’ या नावाने झालेल्या या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याअंतर्गत योगऋषी रामदेवबाबा यांनी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस्), भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी (आयपीएस्), पोलीस कर्मचारी, तसेच सर्व शासकीय अधिकारी यांच्यासाठी पणजीतील योग-सेतू येथे विशेष योगवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा बोलत होते.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे...
सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज...
अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !
वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद