
रामनाथी (फोंडा) – २५ जानेवारीला झालेल्या रथसप्तमीच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत सूर्यनमस्कार शिबिर घेण्यात आले. भौतिकोपचार तज्ञ सौ. अक्षता रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. सूर्याला नमन करत ‘आदित्य हृदयं स्तोत्र’ म्हणून सूर्यनमस्कार घालण्यास आरंभ करण्यात आला. १० साधकांनी १०८, तर ७ साधकांनी ५० हून अधिक सूर्यनमस्कार घालून रथसप्तमीच्या सणाचा लाभ करून घेतला. सूर्यनमस्कार घालणाऱ्यांमध्ये १८ वर्षे वयापासून ७२ वर्षे वयाच्या वृद्धांचा देखील उत्साहपूर्वक सहभाग होता. सूर्यनमस्काराचे आरोग्यदृष्ट्या लाभ लक्षात घेता रथसप्तमीपूर्वी १ महिना अनेक साधक एकत्रित सूर्यनमस्कार घालत होते. सूर्यनमस्कार घातल्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारणे, लवचिकता वाढणे, ताजे तवाने वाटणे, थकवा न्यून होणे, उत्साह वाढणे, असे अनेक लाभ साधकांना अनुभवायला मिळाले. यापुढे प्रतिदिन सूर्यनमस्कार घालण्याचा साधकांनी निश्चय केला आहे.
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !