नवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या दिवशी कलकाजी, अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

एर्नाकुलम् (केरळ) येथे आयोजित केलेल्या साधनाविषयक प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

एर्नाकुलम् येथील तम्मनम्मधील नालंदा सभागृहामध्ये झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी सुरेश यांनी साधनेविषयी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

जोशपूर्ण घोषणांनी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून दुमदुमली सांगली नगरी !

श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी १ सहस्र २०० हिंदूंनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् यासारख्या अनेक जोशपूर्ण घोषणा देऊन हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला.

इंदूर (तेलंगाणा) येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’ला वारकरी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१९ मे या दिवशी काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये आर्य समाज, ओम शांती, भारतमाता भजनी मंडळ, विठ्ठलेश्वरी मंदिराच्या वारकरी संप्रदायाचे भक्त, सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासमवेत २५० हून अधिक लोक सहभागी झाले होते.

सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले.

‘हिंदू एकता दिंडी’ने अमरावती येथे चेतवले हिंदुत्वाचे स्फुलिंग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीमुळे शहरात वीरश्री निर्माण होऊन सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्‍या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.

हिंदूजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली विविध जिल्ह्यांतील ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले.