सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील जिज्ञासूंना केलेल्या ‘ऑनलाईन’ संपर्काला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील वाचक, जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् प्रशिक्षणवर्गातील युवक-युवती यांची ‘ऑनलाईन’ भेट घेतली. तेव्हा सर्व जिज्ञासूंचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आणि त्यांनी साधनेला आरंभ केला. तेव्हा ‘जिज्ञासूरूपी फुले उमलून गुरुदेवांच्या चरणी अर्पण होत आहेत’, असे मला अनुभवता आले.

 

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी जिज्ञासूंशी जवळीक
साधून त्यांना मनमोकळेपणाने बोलायला प्रवृत्त करणे

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये यांनी जिज्ञासूंना केलेल्या ‘ऑनलाईन’ संपर्काच्या वेळी सद्गुरु ताईंना पाहिल्यावर काही जिज्ञासूंना ‘सद्गुरु स्वातीताईंशी किती आणि काय बोलू ?’, असे झाले होते. काही जिज्ञासूंचा भाव जागृत होऊन त्यांना बोलता येत नव्हते, तर काही जणांना ‘सद्गुरूंच्या समोर कसे बोलायचे ?’, असे वाटून बोलता येत नव्हते. तेव्हा सद्गुरु स्वातीताई मोठ्या प्रेमाने जिज्ञासूंना ‘तुम्हाला साधनेत कोणत्या अडचणी आहेत ? तुम्ही साधनेसाठी कसे प्रयत्न करता ? तुम्हाला कोणत्या अनुभूती आल्या ?’, असे विचारून त्यांना बोलते करत होत्या. त्यामुळे जिज्ञासूंना आनंद आणि उत्साह वाटून सद्गुरु ताईंविषयी जवळीक वाटली. ते सद्गुरु ताईंशी मनमोकळेपणे बोलत होते आणि त्यांना स्वतःच्या साधनेचे प्रयत्न सांगत होते.

 

२. सद्गुरु स्वाती खाडये यांनी जिज्ञासूंना सेवा करण्यास प्रोत्साहन देणे

पू. (कु.) दीपाली मतकर

सद्गुरु स्वातीताई जिज्ञासूंच्या स्थितीनुसार त्यांना नामजपादी उपाय करायला सांगत होत्या. त्यांची सेवेची तळमळ आणि कौशल्य जाणून घेऊन त्यांना ‘ते कोणती सेवा करू शकतात ?’, हे सांगून सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या. त्यामुळे जिज्ञासू कृतज्ञताभावाने सेवा करू लागले आहेत.

 

३. एका जिज्ञासू महिलेच्या संपर्काच्या वेळी
अनेक अडचणी येणे; परंतु साधकांनी शरणागतीने
प्रार्थना केल्यावर अडचणी दूर होऊन त्या महिलेचा आध्यात्मिक त्रासही न्यून होणे

सद्गुरु स्वातीताई एका जिज्ञासू महिलेशी बोलत असतांना ‘त्या महिलेला थोडा आध्यात्मिक त्रास होत होता’, असे मला जाणवले. त्यांचा तोंडवळा काळवंडला होता; पण त्यांची सेवा करण्याची तळमळ पुष्कळ चांगली होती. या ‘ऑनलाईन’ संपर्कामध्ये अनेक अडचणी येत होत्या. तेव्हा आम्ही शरणागतीने प्रार्थना केल्यावर संपर्क व्यवस्थित झाला. ‘संपर्कानंतर त्या महिला जिज्ञासूचा तोंडवळा पालटला’, असे आम्हाला जाणवले.

 

४. सद्गुरु स्वाती खाडये यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन
केल्यानंतर जिज्ञासूंनी साधना आणि सेवा यांना आरंभ करणे

सद्गुरु स्वातीताई जिज्ञासूंना नेमकेपणाने योग्य दिशा देत होत्या. त्यामुळे ‘जिज्ञासूंची सेवा आणि साधना करायची सिद्धता होत होती’, असे आमच्या लक्षात आले.

४ अ. डॉ. मनीषा चव्हाण यांनी प्रथमोचार सेवेचे दायित्व घेणे

डॉ. मनीषा चव्हाण त्यांच्या लग्नापूर्वी सेवा करायच्या; पण लग्नानंतर त्यांचे साधनेचे प्रयत्न न्यून झाले होते. सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन झाल्यावर त्यांच्यात पालट झाला. त्यांनी प्रथमोपचार सेवेचे दायित्व घेतले. आता त्या त्यांच्या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना नामस्मरण करण्यासही सांगू लागल्या आहेत.

४ आ. काही जिज्ञासूंनी प्रवचन करण्याची सेवा करण्यास आरंभ करणे

सद्गुरु स्वातीताईंनी सोलापूर येथील जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ संपर्क केले. त्यांतील काही जिज्ञासू गुरुपौर्णिमेसाठी प्रवचन करण्यास सिद्ध झाले. त्यांचा प्रवचन करण्याचा सराव करवून घेतला. आता त्यांतील २ जिज्ञासू प्रवचन करण्याची सेवा करत आहेत.

४ इ. एका जिज्ञासूंच्या दोन मुली ‘राष्ट्रीय युवा शिबिर’
आणि ‘पश्चिम महाराष्ट्र प्रथमोपचार वर्ग’ यांना जोडल्या जाणे

एका जिज्ञासूंच्या संपर्कात ‘त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण ‘फार्मसी’ क्षेत्रात झाले आहे आणि त्या मुलींना सेवा अन् साधना करण्याची तळमळ आहे’, असे आमच्या लक्षात आले. सद्गुरु स्वातीताईंनी केलेल्या संपर्काचा त्यांना पुष्कळ लाभ झाला आणि त्या दोघीही ‘राष्ट्रीय युवा शिबिर’ अन् ‘पश्चिम महाराष्ट्र प्रथमोपचार वर्ग’ यांना जोडल्या गेल्या.

४ ई. आता दोन जिज्ञासू बालसंस्कारवर्ग घेत आहेत.

४ उ. काही धर्मप्रेमी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करू लागले आहेत.

‘हे गुरुमाऊली, ‘सद्गुरु स्वातीताईंच्या माध्यमातून तुम्हीच आम्हाला संपर्काच्या सेवेतून ‘समष्टी गुरुरूपाची सेवा कशी करायची ? जिज्ञासूंना गुरुकार्याशी कसे जोडायचे ?’, हे शिकवले’, त्यासाठी आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना होऊन तुमची कृपा अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (१६.४.२०२२)

 

५. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या समवेत जिज्ञासूंना
‘ऑनलाईन’ संपर्क करण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्रीमती अलका व्हनमारे

५.अ. संपर्क पूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

‘जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ संपर्क करण्याची सेवा चालू करतांना भ्रमणभाषला व्यवस्थित ‘रेंज’ येण्याच्या दृष्टीने सद्गुरु स्वातीताईंचे बसण्याचे नियोजन केले होते; पण तरीही शेवटचा संपर्क करतांना अकस्मात् त्यांच्या भ्रमणभाषची ‘रेंज’ गेली. तेव्हा त्या तळमळीने जिन्यातून खाली-वर करत ‘रेंज’ मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. शेवटी त्यांनी जिन्याच्या पायरीवर बसूनच तो संपर्क पूर्ण केला.

५.आ. ‘जिज्ञासू साधनेच्या पुढच्या टप्प्यात जात आहेत’, असे वाटणे

या सेवेत आमचीही या जिज्ञासूंशी भेट झाली. तेव्हा ‘ते सर्व जिज्ञासू साधनेच्या पुढच्या टप्प्यात जात आहेत’, असे मला वाटले. ही सर्व केवळ श्री गुरु आणि सद्गुरु स्वातीताई यांची कृपाच आहे.’

– श्रीमती अलका व्हनमारे, सोलापूर (१६.४.२०२२)

Leave a Comment