सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी

राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी संतपदी आरुढ झाल्याचे दिनांक ८ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. पू. (श्रीमती) शहाणेआजी सनातनच्या ५५ व्या संत आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भगवान शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी हा स्त्रियांचा अपमान नव्हे !, हे प्रतिपादन योग्य कि अयोग्य ?

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत काही विधाने केली. या विधानांच्या संदर्भात एबीपी माझा, साम इत्यादी वृत्तवाहिन्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.

कर्नाटक येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेण्याची प्रथा धर्मसंमत आहे का ?

मंगळुरू येथील कुक्के श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात प्रतिवर्षी कार्तिक कृ. षष्ठीला उत्सव असतो. या दिवशी देवतापूजनानंतर प्रथम ब्राह्मणभोजन केले जाते. या वेळी ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा आहे.

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी का ?

शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती चौथर्‍यावर उभी आहे. मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्‍यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात…

शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य ?

शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण : भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते, यासाठी …

महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.

पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त करून देणारे कोकिला व्रत !

अधिक आषाढ मासानंतरच्या निज आषाढात जी स्त्री महिनाभर कोकिळेचे दर्शन घेतल्याविना अन्न ग्रहण करणार नाही आणि व्रतस्थ राहील, तिला पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होईल, असे भगवान शंकराने देवी सतीला सांगितले.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात ?

प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते. पुष्कळ आयुर्वेदीय महाविद्यालयांच्या रोपवाटिका असतात. स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.

औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !

औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.