सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून प्रसिद्धी

कुंभमेळा प्रशासनाद्वारे देश-विदेशातील पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बातम्या पुरवण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅपचा गट बनवण्यात आला आहे  या गटात कुंभमेळा प्रशासनाद्वारे हा लेख सनातनचे साधक ग्रंथ वितरण करत असतांनाच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला आहे.

तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे ! – आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार

या नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन धर्माला बळकटी मिळत आहे. तुम्ही विज्ञानाच्या आधारावर धर्म प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहात. त्याविषयी तुम्हाला धन्यवाद देतो, असे कौतुकोद्गार येथील ज्वालापूर विधानसभेचे भाजप आमदार आणि महामंडलेश्वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांनी केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्‍लेषण

येथील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा आध्यात्मिक स्तरावर विचार करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा आश्रम आदर्श बनवला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर होय.

दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

येत्या आपत्काळात तरून जाण्यासाठी पूर्वसिद्धतेविषयी सांगणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सध्या देश आणि धर्म यांच्या दृष्टीकोनातून आपत्काळ चालू आहे. नैसर्गिक आपत्ती सतत येणे, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे प्राबल्य वाढणे, राजकीय अस्थैर्य निर्माण करणार्‍या घटना घडणे, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या शुभ कार्यामध्ये विघ्ने येणे इत्यादी आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत. अशा काळात सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन संघर्षशील होते !

जगावरील विनाशकारी संकटे !

सध्या संपूर्ण विश्‍वात, तसेच भारतातही आपत्काळाला प्रारंभ झाला आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा संपूर्ण विश्‍वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

रामनाथी (गोवा) – हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले. गुढीचे पूजन सनातन पुरोहित पाठशाळेचे कु. विश्‍व अय्या यांनी केले. या वेळी … Read more

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’ने वर्तवली आहे. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलीदान द्यावे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या अहवालाला जगातील सगळे देश आणि गुप्तचर संघटना गंभीरपणे घेतात

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.