हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !

कुंभमेळ्यामधील मानाच्या विविध आखाड्यांचे साधूसंत यांच्यासह लाखो भाविकांनी गंगेमध्ये सोमवती अमावास्येच्या दिवशीचे दुसरे पवित्र स्नान केले. या प्रसंगी ‘हरकी पौडी’ येथे विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्वर यांसह साधू-संत आणि लाखो भाविक यांनी गंगास्नान केले.

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.

आपला शेजारी किंवा इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्ण आढळल्यास काय काळजी घ्यावी ?

कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) असलेल्या रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराशी संपर्क टाळावा.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती प्रत्येकापर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत. आपले महान संस्कार सर्वांपर्यंत पोचवण्याचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी येथे काढले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

हिंदु जनजागृती समितीसह सनातन संस्थेने ‘धर्म आणि राष्ट्र’विषयक चित्रमय प्रदर्शनाद्वारे धर्माविषयीचे बारकावे सांगितले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे या संघटनांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी काढले.

‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्रीष्म ऋतूच्या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्वसिद्धता

सर्वांनीच प्रतिदिन दिवसातून ५ – ५ मिनिटे असे तीन वेळा दीर्घ श्‍वास घ्यावा. हा श्‍वास घेतांना अधिकाधिक हवा फुप्फुसांत ओढून घ्यावी. ही हवा शक्य तेवढा वेळ आत धरून ठेवावी. (म्हणजे कुंभक करावा.) आणि नंतर ती सावकाश सोडावी. असे केल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते. कोरोनामध्ये फुप्फुसे घट्ट होण्याची शक्यता असते. असे केल्याने ती शक्यता अल्प होते.

इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू

 इंडोनेशियातील पूर्व भागात पूर आणि भूस्खलन यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४० हून अधिक झाली, तर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘कृतज्ञता सोहळा’ पार पडला. ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी अन्य संतांनी दिलेले आशीर्वाद, तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या शुभेच्छा यांचे वाचन करण्यात आले. उपस्थित संत आणि मान्यवर यांनी सत्संगांमुळे समाजाला होणारे लाभ विशद केले.

देशात आणीबाणी आणि युद्ध यांसारखी स्थिती निर्माण होऊ शकते !

येत्या १३ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष म्हणजे गुढी पाडवा आहे. या नववर्षाचा राजा मंगळ ग्रह असणार आहे. जेव्हा वर्षाचा राजा आणि मंत्री मंगळ सारखा ग्रह असतो त्या वेळी हिंदु ज्योतिषशास्त्रानुसार युद्ध आणि आणीबाणी यांची स्थिती निर्माण होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले अनी आखाड्यांच्या पेशवाईंचे स्वागत !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनी आखाड्यांच्या सर्व पेशवाईंचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे या आखाड्यांच्या साधूसंतांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या पेशवाईमध्ये महामंडलेश्‍वर, महंत आणि शेकडो भक्तगण सहभागी होते.