तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे ! – आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार

ज्वालापूर विधानसभा (हरिद्वार) येथील भाजप आमदार आणि
महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांची सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला भेट

हरिद्वार – या नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुम्ही प्रदर्शनाच्या स्वरूपात लावलेले हे केंद्र अत्यंत सुंदर आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन धर्माला बळकटी मिळत आहे. तुम्ही विज्ञानाच्या आधारावर धर्म प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहात. तपोभूमी हरिद्वारमध्ये तुम्ही हे कार्य करत आहात, त्याविषयी तुम्हाला धन्यवाद देतो, असे कौतुकोद्गार येथील ज्वालापूर विधानसभेचे भाजप आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला श्री. सुरेश राठौर यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी श्री. सुरेश राठौर यांना केंद्रातील धर्म आणि राष्ट्र विषयक ग्रंथ, फलक प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांची माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सत्कार केला.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment