परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून पिवळसर छटा येणे आणि त्याला अष्टगंधाचा सुगंध येणे यांमागील अध्यात्मशास्त्र !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून विश्‍वाचे कल्याण होणार आहे. त्यांच्याकडून सूक्ष्मातून होत असलेल्या या अद्वितीय कार्याचा स्थुलातील परिणाम त्यांच्या नियमित वापरात असलेल्या वस्तूंवर दिसून येतो. या लेखात सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.

कु. मधुरा भोसले
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००७ ते वर्ष २०१५ या कालावधीत वापरलेल्या उपनेत्राच्या (चष्म्याच्या) काचांचा रंग पालटून तो पिवळा झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नेत्रांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि शक्ती यांच्या कार्यरत स्पंदनांचा दृश्य परिणाम या उपनेत्रामध्ये दिसून येतो. या उपनेत्राच्या काचांपेक्षा त्यांच्या कडा अधिक प्रमाणात पिवळ्या झाल्या आहेत. उपनेत्राच्या डाव्या काचेच्या तुलनेत उजवी काच अधिक प्रमाणात पिवळी झाल्याचे दिसून येते. या उपनेत्रातून पिवळसर रंगाचा प्रकाश प्रक्षेपित होतांना जाणवतो, तसेच या उपनेत्राला अष्टगंधाचा सुगंधही येतो.’

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन-विभाग समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२१)
अष्टगंधाचा सुगंध येणारे आणि पिवळ्या रंगाची छटा आलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उपनेत्र (चष्मा)

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील
उपनेत्राच्या (चष्माच्या) संदर्भात झालेले पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील उपनेत्राचा रंग पिवळा होण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्व कार्यरत झाले आहे, असे मला जाणवले. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्वमय इच्छाशक्ती कार्यरत होते, तेव्हा विश्‍वभरातील चांगल्या जिवांच्या मनात धर्माचरण आणि साधना करण्याची सात्त्विक इच्छा जागृत होते, असे मला वाटले. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्वमय क्रियाशक्ती कार्यरत होते, तेव्हा विश्‍वभरातील सात्त्विक जिवांकडून धर्मरक्षणाच्या कृती होऊन त्यांच्याकडून प्रत्यक्षरित्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न होतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्वमय ज्ञानशक्ती कार्यरत होते, तेव्हा विश्‍वभरातील सात्त्विक जिवांना धर्म, अध्यात्म, विविध विद्या आणि कला यांचे ज्ञान प्राप्त होऊन त्यांचा विकास होतो. काळानुसार संपूर्ण विश्‍वात हिंदु धर्म आणि अध्यात्मशास्त्र यांचा विहंगम गतीने प्रसार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्वमय ज्ञानशक्ती कार्यरत झालेली आहे, असेही मला जाणवले. ही ज्ञानशक्ती त्यांच्या आज्ञाचक्रातून संपूर्ण विश्‍वात निर्गुण-सगुण स्तरावर प्रक्षेपित होते. डोळे हे आज्ञाचक्राच्या जवळ असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोळ्यांतून सगुण-निर्गुण स्तरावरील ज्ञानशक्ती पिवळ्या रंगाच्या लहरींच्या स्वरूपात संपूर्ण वातावरणात प्रक्षेपित होते. या ज्ञानलहरींचा परिणाम त्यांनी घातलेल्या उपनेत्रावर (चष्म्यावर) झाल्यामुळे त्यांच्या वापरातील उपनेत्राचा रंग पिवळा झाला आहे.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील उपनेत्राच्या डाव्या काचेच्या तुलनेत उजवी काच
अधिक प्रमाणात पिवळी झाल्याचे दिसण्यामागील सूक्ष्म-प्रक्रिया आणि त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

चंद्र आणि सूर्य हे विश्‍वपुरुष किंवा विराटपुरुष याचे दोन नेत्र आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले हे या विराटपुरुषाचेच प्रतिरूप आहेत. त्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्यात सूर्यदेवाची आणि डाव्या डोळ्यात चंद्रदेवाची शक्ती कार्यरत असते. जेव्हा त्यांच्याकडून संपूर्ण विश्‍वात विष्णुमय ज्ञानशक्तीचे प्रक्षेपण होते, तेव्हा त्यांच्या उजव्या डोळ्यातून सूर्याच्या तेजासमान दीप्तीमान असणारा तेजोमय पिवळसर रंगाचा प्रकाश प्रक्षेपित होतो. त्याचप्रमाणे त्यांच्या डाव्या डोळ्यातून चंद्रासमान शीतल असणारा मंद स्वरूपाचा पिवळसर रंगाचा प्रकाश प्रक्षेपित होतो. डाव्या डोळ्यामध्ये अप्रगट अवस्थेतील ज्ञानशक्ती कार्यरत असून उजव्या डोळ्यात प्रगट स्वरूपातील ज्ञानशक्ती कार्यरत असते. शक्तीचे प्रगटीकरण जितके अधिक असते, तितके त्याचे सगुण रूपात घनीकरण अधिक प्रमाणात होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या डोळ्याच्या तुलनेत उजव्या डोळ्यामध्ये ज्ञानशक्तीचे घनीकरण अधिक प्रमाणात झाल्यामुळे त्यांच्या वापरातील उपनेत्राच्या डाव्या काचेच्या तुलनेत उजवी काच अधिक प्रमाणात पिवळी झालेली आहे. त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून ज्ञानशक्तीच्या लहरी एकाच वेळी प्रक्षेपित होतात. त्यामुळे त्यांच्या उपनेत्राकडे पहातांना सूर्याचे प्रतीक असणार्‍या त्यांच्या उजव्या डोळ्याच्या समोरील उपनेत्राच्या काचेवर तेजोमय पिवळसर रंग स्थुलातून दिसतो आणि त्यांच्या डाव्या डोळ्याच्या समोरील उपनेत्राच्या काचेला पाहून मनाला शांती अन् शीतलता जाणवते.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील उपनेत्राच्या काचांच्या
पृष्ठभागांपेक्षा त्यांच्या कडा अधिक प्रमाणात पिवळ्या रंगाच्या होण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

तेजतत्त्व सगुण-निर्गुण स्तरावर कार्यरत असते, तर पृथ्वीतत्त्व सगुण स्तरावर कार्यरत असते. कोणत्याही पंचतत्त्वांतील सगुण तत्त्वामुळे त्या तत्त्वाचे घनीकरण अधिक प्रमाणात होऊन त्याचा रंग आणि रूप साकार होते. उपनेत्राच्या काचांमध्ये तेजतत्त्व अधिक प्रमाणात असल्यामुळे त्या अधिक पारदर्शक दिसत आहेत. उपनेत्राच्या काचांच्या कडांमध्ये पृथ्वीतत्त्व अधिक प्रमाणात असल्यामुळे त्या अल्प प्रमाणात पारदर्शक दिसत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्राच्या काचांच्या पृष्ठभागांतून समोरच्या दिशेने निर्गुण-सगुण स्तरावर, तर उपनेत्राच्या काचांच्या कडांतून दशदिशांना सगुण-निर्गुण स्तरावर ज्ञानशक्ती आणि चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील उपनेत्राच्या काचांच्या पृष्ठभागांपेक्षा त्यांच्या कडा अधिक प्रमाणात पिवळ्या रंगाच्या झाल्या आहेत.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वी, तेज आणि आकाश
या तीन तत्त्वांच्या स्तरावर संपूर्ण विश्‍वात ज्ञानशक्तीचे प्रक्षेपण होणे

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर
ज्ञानशक्तीचे प्रक्षेपण झाल्यामुळे त्यांच्या उपनेत्राला अष्टगंधाचा सुगंध येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह बाह्यतः मानवी वाटत असला, तरी त्यामध्ये कार्यरत असणार्‍या ईश्‍वरी चैतन्यामुळे तो खर्‍या अर्थाने दैवी झालेला आहे. त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडून साधकांना आवश्यक असणार्‍या कोणत्याही शक्तीचे प्रक्षेपण होते, तेव्हा त्यांचे दिव्यतत्त्व दर्शवणारा दैवी सुगंध आणि दैवी रंग त्यांच्या स्थूल देहावर अन् त्यांच्या स्थूल देहाशी संबंधित असणार्‍या घटकांवर, उदा. उपनेत्र, त्यांची रहाती खोली इत्यादींच्या माध्यमातून प्रगट होतो. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावरील ज्ञानशक्तीचे प्रक्षेपण झाल्याने त्यांच्या उपनेत्राला अष्टगंधाचा सुगंध येऊ लागला.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून तेज आणि आकाश
या तत्त्वांच्या स्तरावर ज्ञानशक्तीचे प्रक्षेपण झाल्यामुळे झालेले परिणाम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानशक्तीचे कार्य अधिक प्रमाणात तेज आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर होत आहे. सगुण स्तरावरील ज्ञानशक्ती ही ज्ञानतेजाच्या रूपाने कार्यरत असते, तर आकाशतत्त्वाच्या स्तरावरील ज्ञानशक्ती ही शब्द किंवा नाद याच्या रूपाने कार्यरत असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील उपनेत्राच्या काचा सगुण स्तरावर तेजोमय ज्ञानशक्तीच्या लहरींमुळे पिवळसर रंगाच्या झाल्या आहेत. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून आकाशतत्त्वाच्या स्तरावरील ज्ञानशक्तीचे प्रक्षेपण होत असल्यामुळे त्यांच्या खोलीतील पंख्यातून, शौचालयातील ‘फ्लश’ आणि नळ यांतून वहाणार्‍या पाण्यातून, तसेच विविध ठिकाणी असणारे सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे आणि साधकांची घरे येथे विविध प्रकारचे दैवी नाद निर्माण झाले आहेत. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या ज्ञानशक्तीमुळे साधकांमध्ये ब्राह्मतेज जागृत होऊन त्यांना हिंदु धर्म आणि अध्यात्मशास्त्र यांचे सखोल ज्ञान प्राप्त होऊन ते त्यांसंदर्भातील विषय प्रभावीपणे मांडत आहेत किंवा त्यांविषयी लेख लिहीत आहेत. त्याचप्रमाणे सनातनच्या काही साधकांना ईश्‍वराकडून पृथ्वीवर दुर्मिळ असणारे ईश्‍वरी ज्ञान प्राप्त होत आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि अध्यात्म यांच्या आचरणातील कृतींच्या संदर्भातील शास्त्र उलगडणारे ज्ञान विविध ग्रंथांच्या रूपाने सिद्ध होत आहे. हे ज्ञान विविध भाषांमध्ये भाषांतर होऊन ते संकेतस्थळ आणि ग्रंथ यांच्या माध्यमांतून विश्‍वभरातील जिज्ञासूंना उपलब्ध होत आहे. त्यामुळे ज्ञानशक्तीच्या बळावर संपूर्ण विश्‍वात हिंदु धर्म आणि अध्यात्मशास्त्र यांचा विहंगम गतीने प्रसार होऊन विविध देशांतील अनेक लोक ज्ञानाने प्रभावित होऊन धर्माचरण अन् साधना करू लागले आहेत.

 

३. शक्तीचा प्रकार आणि तिच्याशी संबंधित सुगंध अन् रंग


अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या ज्ञानशक्तीमुळे संपूर्ण विश्‍वातील मनुष्यांना ज्ञानामृत मिळून त्यांच्या जन्माचे सार्थक होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे अनमोल ज्ञान देऊन अनेक जिवांचा उद्धार केला आहे. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२१)

वाचकांना निवेदन !

‘छपाईतील तांत्रिक अडचणींमुळे येथे प्रसिद्ध केलेली छायाचित्रे जशी आहेत, तशी छापून येतीलच’, असे नाही. यावर उपाय म्हणून आणि प्रत्येकाला हे आकार दिसावेत अन् विषय कळावा, यासाठी छायाचित्रांतील आकार संगणकाच्या साहाय्याने अधिक उठावदार केली आहेत, याची नोंद घ्यावी.)

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. त्यामध्ये एक आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून त्यावर पिवळसर छटा येणे आणि त्याला अष्टगंधाचा सुगंध येणे ! उपनेत्राचा रंग पालटण्यामागील वैज्ञानिकदृष्ट्या कारण काय आहे ? त्यामध्ये आपोआप पालट कसे होतात ? त्याचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करायचे ?’ या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, ई-मेल : [email protected])
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment