सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण केल्याने जळूच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल
ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आयुर्वेदाची देवता श्री धन्वन्तरिदेवाच्या चित्रात तिच्या उजव्या हातात जळू पहायला मिळते. जळवांचा उपयोग आयुर्वेदामध्ये साधारणपणे शरिरातील रक्ताच्या संदर्भातील व्याधी निवारणासाठी केला जातो. ३०.७.२०२० या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक जळू सापडली. ती सात्त्विक वस्तूंकडे आकृष्ट होत असल्याचे लक्षात आले. १.८.२०२० या दिवशी एका काचेच्या पेटीत सनातन-निर्मित श्री धन्वन्तरि देवाचे चित्र अन् श्री दुर्गादेवीचे चित्र थोड्या अंतरांवर ठेवण्यात आले. त्यानंतर जळूला त्या पेटीत सोडण्यात आले. जळूने देवतांच्या सात्त्विक चित्रांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

सनातन-निर्मित श्री धन्वन्तरि देवाचे चित्र अन् श्री दुर्गादेवीचे चित्र आणि जळू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

सनातन-निर्मित श्री धन्वन्तरि देवाचे चित्र आणि श्री दुर्गादेवीचे चित्र यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती. प्रयोगानंतर जळूच्या सकारात्मक पुष्कळ ऊर्जेत वाढ झाली.

वरील विवेचन पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

चाचणीतील घटक घटकांच्या नकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ ( मीटर )
घटकांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ( मीटर )
‘इन्फ्रारेड’ ऊर्जा   अल्ट्राव्हायोलेट  ऊर्जा  
१. श्री धन्वन्तरि देवाचे सात्त्विक चित्र नाही नाही २३ ( टीप )
२. श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र नाही नाही २३ (टीप )
३. जळू प्रयोगापूर्वी नाही नाही ३.२२
प्रयोगानंतर नाही नाही ४.९२

टीप – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने चित्रांच्या प्रभावळी २३ मीटरच्या पुढे अचूक नोंदी मोजता आल्या नाही.

 

२. निष्कर्ष

सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांचा चांगला परिणाम जळूच्या सकारात्मक ऊर्जेवर झाल्याने तिच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. सनातन-निर्मित श्री धन्वन्तरि देवाचे सात्त्विक चित्र
अन् श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असणे

स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे साधक-कलाकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेली आहेत. यामुळे त्या चित्रांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व (चैतन्य) आले आहे. चाचणीतील सनातन-निर्मित श्री धन्वन्तरि देवाचे आणि श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

३ आ. जळूने श्री धन्वन्तरि देवाचे सात्त्विक चित्र अन् श्री दुर्गादेवीचे
सात्त्विक चित्र यांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

प्रा. सुहास जगताप

जळूला काचेच्या पेटीत सोडल्यावर तिने प्रथम श्री धन्वन्तरि देवाच्या चित्राकडे जाण्याचा प्रयत्न केला. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर मात्र ती श्री दुर्गादेवीच्या चित्राकडे वळली. तिने श्री दुर्गादेवीच्या चित्राला स्पर्श केला आणि देवीच्या चरणांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जळू श्री धन्वन्तरि देवाच्या चित्राकडे गेली आणि तिने चित्राला स्पर्श करून देवाच्या चरणांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगात श्री धन्वन्तरि देवाच्या चित्राजवळ जळू अधिक वेळ थांबली होती. त्या वेळी साधारण एक मिनिट ती शांत बसून राहिली होती, जणू तिचे ध्यान लागले होते. थोड्या वेळाने ती बाजूला गेली.

जळू सात्त्विक असल्याने तिच्यामध्ये आरंभीही (३.२२ मीटर) पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. तिने देवतांच्या सात्त्विक चित्रांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण केल्याने तिच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. जळूमध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असल्याने तिला देवतांच्या चित्रांतून उच्च स्तरीय चैतन्य प्रक्षेपित होत आहे, हे ओळखता आले. एखादा भक्त ज्याप्रमाणे त्याच्या उपास्यदेवतेला भावपूर्ण नमस्कार करतो, त्याप्रमाणे जळूने दोन्ही देवतांच्या चित्रांना स्पर्श केला आणि त्यांच्या चरणांपाशी गेली. यातून ‘जळूला सात्त्विकतेची पुष्कळ ओढ असून तिचा देवतांप्रती पुष्कळ भाव आहे’, हे लक्षात येते.’

– प्रा. सुहास जगताप, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, मिरज.  (२७.८.२०२०)

ई-मेल : [email protected]

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment