परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी काढलेल्या सात्त्विक रांगोळ्या, सात्त्विक चित्रे यामध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जे’चे(चैतन्य) वैज्ञानिक परीक्षण

यज्ञ-याग यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी काढलेल्या देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवतांच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा
स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र
सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदु धर्मातील सर्व सण आणि विधी विविध देवतांशी संबंधित आहेत. त्या त्या सणाच्या दिवशी आणि विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असते अन् विधीमुळे रांगोळीमध्ये आकृष्ट होते. प्रत्येक सणानुसार त्या-त्या देवतेचे तत्त्व रांगोळीतून अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन त्याचा सर्वांना लाभ व्हावा, अशा उद्देशाने सनातन संस्थेच्या साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या अनेक सात्त्विक रांगोळ्या सिद्ध केल्या आहेत. सनातन संस्थेचा लघुग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’ यामध्ये त्या दिल्या आहेत. या सनातन संस्थेच्या सात्त्विक रांगोळ्या कु. संध्या माळी यांनी रेखाटलेल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या तत्त्वाने भारित होऊन त्याचा सर्वांना लाभ होतो. देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवतेचे सात्त्विक चित्र आणि सात्त्विक रांगोळी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने १६.१०.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

१. चाचणीतील घटकांची माहिती

१ अ. देवतेचे यंत्र

यंत्र म्हणजे एक विशिष्ट आकृतीबंध. ७ व्या शतकात आद्य शंकराचार्यांनी विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणारी विविध यंत्रे निर्मिली आहेत. त्यांपैकी ‘श्री महालक्ष्मी यंत्र’ हे श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे, तर ‘श्रीयंत्र’ श्री दुर्गादेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे आहे.

१ आ. देवतेचे सात्त्विक चित्र

सनातन संस्थेच्या साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार श्री लक्ष्मीदेवीचे आणि श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र सिद्ध केले आहे. त्यामध्ये त्या त्या देवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आले आहे.

१ इ. सात्त्विक रांगोळी

या रांगोळ्यांपैकी एका रांगोळीमध्ये श्री लक्ष्मीदेवीचे, तर अन्य दुसर्‍या रांगोळीमध्ये श्री दुर्गादेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. या रांगोळ्या सनातन संस्थेच्या कलाकार साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटल्या आहेत.

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारी सात्त्विक रांगोळी
श्री दुर्गादेवीचे तत्त्व आकृष्ट करणारी सात्त्विक रांगोळी

 

२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्याशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या, यंत्र आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्याशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या, यंत्र आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

चाचणीतील घटक घटकांच्या सकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
१. श्री लक्ष्मीदेवीशी संबंधित घटक
अ. श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारी सात्त्विक रांगोळी १.८४
आ. श्री महालक्ष्मी यंत्र ३.६०
इ.  श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र ४.५४
२. श्री दुर्गादेवीशी संबंधित घटक
अ. श्री दुर्गादेवीचे तत्त्व आकृष्ट करणारी सात्त्विक रांगोळी १.८७
आ. श्रीयंत्र ४.०५
इ.  श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र ४.२८

 

३. निष्कर्ष

श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सनातन-निर्मित सात्त्विक रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवींच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) आहे.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

 

४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्याशी संबंधित यंत्रांमध्ये पुष्कळ चैतन्य असणे

श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्याशी संबंधित यंत्रे आद्य शंकराचार्यांनी (अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी) बनवली आहेत. ७ व्या शतकात होऊन गेलेले आद्य शंकराचार्य हे अवतारी पुरुष होते. त्यांच्यात सूक्ष्मातीसूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असल्याने त्यांनी उपासकांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणारी देवतांची विविध यंत्रे निर्माण केली. ही यंत्रे पुष्कळ सात्त्विक आहेत, तसेच त्या यंत्रांमध्ये संबंधित देवतातत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे चाचणीतील श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्याशी संबंधित यंत्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी
काढलेल्या श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांचे तत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक
रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवीच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक स्पंदने असणे

स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे साधक-चित्रकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेली आहेत. यामुळे त्या चित्रांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व (चैतन्य) आले आहे. त्यामुळे ती चित्रे पुष्कळ सात्त्विक बनली असून त्या चित्रांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

सर्वसाधारणपणे सर्वच रांगोळ्यांमध्ये सकारात्मक स्पंदने नसतात. रांगोळी जेवढी सात्त्विक, तेवढी तिच्यात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. त्याचा लाभ रांगोळी काढणारे आणि पहाणारे या दोघांनाही होतो. स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म.’ सात्त्विक रांगोळी विकसित करतांना ‘रांगोळीत देवतेचे तत्त्व येत आहे का ?’, हे कळण्यासाठी चित्रकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. सनातन-निर्मित श्री लक्ष्मीतत्त्व आणि श्री दुर्गातत्त्व असलेल्या रांगोळ्या सनातन संस्थेच्या साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढल्या आहेत. त्या काढत असतांना त्यात संबंधित देवतेचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात आकर्षित होईल, असेच आकृतीबंध वापरले आहेत. या रांगोळ्यांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व आले आहे. यामुळे त्या रांगोळ्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.१०.२०२०)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment