त्याग आणि सेवाभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेले अन् संसारात राहून साधना करून संतपद प्राप्त करणारे रायगड येथील पू. अनंत (तात्या) पाटील !

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रहाणारे पू. अनंत (तात्या) पाटील हे वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ते ८३ वर्षांचे आहेत. ते वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या ते समष्टीसाठी नामजप करतात.

आयुष्यभर कठीण प्रसंगांत देवाचे साहाय्य घेऊन श्रद्धेच्या बळावर परिस्थितीला सामोरे गेलेल्या कै. पू. देवकी परबआजी !

आईने आयुष्यभर त्रास सहन केले. कुटुंबावर आलेल्या संकटसमयी ती धीर देत मानहानीला सामोरी गेली. आम्हाला साधनेत प्रोत्साहन दिले. प.पू. डॉक्टरांवर प्रेम कसे करायचे ?, हे तिने आम्हाला शिकवले.

प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या आणि साधकांना आधार देणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) !

प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांचा नारळी पौर्णिमा (१७.८.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !       १. प्रेमभाव १ अ. आजारपणात साधिकेची काळजी घेणे १ अ १. साधिकेला … Read more

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

पू. आजींचा एकूण प्रवास निर्गुणाच्या दिशेनेच होता. देहत्यागानंतरही त्यांच्या अस्थींनी निर्गुण गंगेकडेच धाव घेतली आणि नंतर त्या पंचगंगेच्या प्रवाहात जाऊन विलीन झाल्या.

सनातनच्या संत पू. सखदेवआजी यांची UTS उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी !

सामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्‍चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो.

पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा जोधपूरच्या महापौरांच्या हस्ते सन्मान !

नुकताच जोधपूर महापालिकेचे महापौर श्री. घनश्याम ओझा यांच्या हस्ते सनातनच्या संत पू. (सौ.) सुशील मोदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे, तसेच राष्ट्र-धर्मविषयी समाजात जागृती आणण्याच्या कार्यामुळे पालिकेकडून हा सत्कार करण्यात आला.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्यांना आनंदाने तोंड कसे द्यायचे, याचा आदर्श देहत्यागाच्या क्षणापर्यंत सर्वांसमोर ठेवणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी !

पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच !

साधकांची पोटच्या मुलांप्रमाणे मायेने काळजी घेणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी !

जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी (पू. मोदीभाभी) यांचा आणि माझा परिचय प्रथम देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झाला. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी बरेच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या मला प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहेत, असे जाणवले.

उतारवयातही नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असलेले आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय गुरुदेवांना देणारे पू. भगवंतकुमार मेनराय !

रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात.

सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – २)

सर्वसामान्य आणि साधना न करणा-या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते अन् प्रतिदिन देवपूजा, पोथीवाचन, उपवास इत्यादी कर्मकांडातील साधना नियमित करणा-या व्यक्तींची आध्यात्मिक पातळी २५ ते ३० टक्के असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला व्यक्ती संतपदाला पोहोचते.