सनातनचे समष्टी दायित्व सांभाळणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि संतांचे मन जिंकण्याचे शिवधनुष्य लीलया पेलणार्‍या अन् सूक्ष्मातील कार्य सांभाळणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान !

पू. (सौ.) बिंदाताई आणि पू. (सौ.) गाडगीळकाकू या संतद्वयी यंदाच्या गुरुपौर्णिमेला सद्गुरुपदी विराजमान होतील, असे अनेक साधकांना वाटत होते.

सनातनच्या विविध गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये झालेल्या कार्यक्रमांत साधकांच्या संतपदाची, तसेच सद्गुरुपदाची घोषणा !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील ६१ व्या,
कपिलेश्‍वरी (गोवा) येथील सौ. सुमन नाईक ६२ व्या आणि
जोधपूर (राजस्थान) येथील सौ. सुशीला मोदी ६३ व्या संतपदी विराजमान !
सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने प्रगती करणार्‍या सौ. सुशीला मोदी संतपदी विराजमान !

गुरुपौर्णिमा, म्हणजे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! या शुभदिनी माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने आध्यात्मिक उन्नती करणार्‍या पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) यांना सनातनच्या ६३ व्या समष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी कपिलेश्‍वरी (फोंडा) येथील पू. (सौ.) सुमन नाईक सनातनच्या संतांच्या मंदियाळीतील ६२ वे संतपुष्प !

सनातन आश्रम, रामनाथी (वार्ता.) – कठीण प्रसंगांतही ईश्‍वरावर असलेली दृढ श्रद्धा, श्रीगुरूंप्रती अपार कृतज्ञताभाव, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निरपेक्षतेने प्रयत्न करणे आदी अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या कपिलेश्‍वरी, फोंडा येथील साधिका सौ. सुमन नाईक (वय ६७ वर्षे) या सनातनच्या ६२ व्या समष्टी संत झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या रामनाथी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वांना मिळाली. सनातनच्या ३ साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याच्या वार्तेने श्रीकृष्णाकडून मिळालेल्या आनंदात आणखी वाढ झाली.

साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

पनवेल – साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे यांना सद्गुरुपदी विराजमान करून भगवंताने सनातनच्या साधकांना गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी अनमोल भेट दिली. नेतृत्व, नियोजनकौशल्य, तत्परता, समयसूचकता, सतर्कता, प्रीती, आर्त शरणागती, क्षात्रवृत्ती आदी गुणसमुच्चयाने युक्त असलेले पू. राजेंद्रदादा यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे सनातनच्या देवद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात घोषित

कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील (वय ८३) यांनी गाठले संतपद !

पनवेल – नागोठणे (जिल्हा रायगड) येथील ८३ वर्षांचे श्री. अनंत (तात्या) पाटील गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतपदी विराजमान झाले, ही शुभवार्ता पेण येथील एका अनौपचारिक कार्यक्रमात घोषित करण्यात आली. सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांच्या शुभहस्ते श्री. अनंत (तात्या) पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पू. पाटीलतात्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६१ वे व्यष्टी संतरत्न ठरले आहेत.

नेतृत्व, तत्त्वनिष्ठा आणि प्रीती अशा विविध गुणांचा संगम असणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर यांच्याप्रती सौ. शालिनी मराठे यांनी अर्पण केलेली भावपुष्पांजली !

रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाची फलनिष्पत्ती सर्वाधिक आहे. या कक्षाचे दायित्व सौ. सुप्रिया माथूर आणि पू. (कु.) रेखा काणकोणकर या पहातात. रामनवमीला (१५.४.२०१६) पू. रेखाताईचे संतत्व घोषित झाले आणि मन आनंदित होऊन डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या, त्या थांबेचनात. पाळेसारख्या आमच्या छोट्या खेडेगावातील कु. रेखाताई तळमळीने साधना करून संतपदाला पोहोचली, तेव्हा श्रीगुरुकृपेने तिच्यासमवेत आमचा अन् गावाचाही उद्धार झाला आहे, असे मला वाटले. देवाने दिलेली ही शब्दफुले पू. रेखाताईच्या चरणी कृतज्ञतेने वहात आहे.

उत्साह आणि आनंदाचा झरा असलेल्या अन् साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करून त्यांची माऊली झालेल्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ मधील दुर्लभ आणि अनमोल गुणवैशिष्ट्ये या लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे. – कु. माधवी पोतदार, रामनाथी आश्रम, गोवा. (४.५.२०१६)

सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांचा खडतर जीवनप्रवास आणि त्यांना आलेल्या अलौकिक अनुभूती

बेळगाव जिल्ह्यातील रामनगर या गावामध्ये दिसणारी साधी भोळी माणसे, त्यांचे साधे राहणीमान आणि त्यांच्या डोळ्यातील निरागस भाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. याच गावात रहातात सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकरमामा !

पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.