परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मशिक्षण देणार्‍या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी) आणि ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी), तसेच प्रबोधनपर लघुपट यांची निर्मिती करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयीचे शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत आणि उपासनाशास्त्र (३ भाग), आरती, क्षात्रगीते आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !

एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने केलेले कार्य

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षाप्राप्ती) हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ शीघ्र गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.

भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली.

चुकीची खंत वाटून ती सुधारण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आजी !

पू. आजी दायित्व असलेल्या साधकांना विचारून प्रत्येक गोष्ट करतात. वरील प्रसंगात पू. आजींचे गुरुधनाची हानी झाल्याविषयीची खंत, गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ, शिकण्याची वृत्ती, विचारून घेण्याची वृत्ती, तत्परता, इतरांचे साहाय्य घेणे, वर्तमानात रहाणे, हे गुण देवाच्या कृपेने अनुभवता आले आणि शिकता आले.

प्रेमळ आणि प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) !

जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या सेवा असतात; पण गुरुदेवांवरील अतूट श्रद्धेमुळे ग्रंथप्रदर्शन लावणे, सनातन प्रभात पाक्षिकांचे वितरण करणे अशा विविध सेवा त्या एकट्याच करतात. त्यांची मुले आणि सुना त्यांना तुम्हाला एकट्याने एवढे सगळे कसे होईल ?, असे म्हणतात. यावर त्यांचे ईश्‍वरच सगळे करवून घेतो आणि तोच माझी काळजी घेतो, हे एकच उत्तर असते. जशी मीराबाईची श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा होती, तशीच त्यांचीही आहे, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !

संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्‍वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.

मृत्यूसारख्या दुःखदायक प्रसंगांतही स्थिर राहून साधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी तळमळीने प्रयत्न करणारे सनातनचे साधक !

‘साधना केल्याने साधकांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडतात. घरात मृत्यूसारखी वाईट घटना घडूनही साधक त्याप्रसंगी स्थिर राहून साधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी तळमळीने प्रयत्न करतात.

साधकांचे मन ओळखून त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय (वय ६४ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टमी (२१.३.२०१७) या दिवशी नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलींना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःच्या जीवितकार्याविषयी वाटणारी कृतार्थता !

अ. साधनेत देवाच्या दिशेने १ पाऊल पुढे टाकले की, देव आपल्या दिशेने १० पावले टाकतो, याची अध्यात्माच्या सर्वच क्षेत्रांत आलेली अनुभूती मी वयाच्या ४३ व्या वर्षी (वर्ष १९८५ मध्ये) साधनेकडे वळलो. ४५ व्या वर्षी (वर्ष १९८७ मध्ये) मला प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली. वर्ष १९९० मध्ये प.पू. बाबांनी देश-विदेशात सर्वत्र धर्मसार करा, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी आवश्यक … Read more