दैवी बालकांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये !

स्वर्ग, महर्, जन, तपस् आणि सत्य अशा उच्च लोकांतून साधना आणि गुरुकार्य यांसाठी पृथ्वीवर जन्म घेणारी बालके, म्हणजे दैवी
बालके !

१. शारीरिक वैशिष्ट्ये

अ. ही बालके सुंदर आणि तेजस्वी असतात.

आ. आपल्या हसण्या-बोलण्याने ती सर्वांची मने लगेच आकर्षून घेतात.

 

२. मानसिक वैशिष्ट्ये

अ. यांच्यात स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अल्प असते.

आ. यांचा स्वभाव मुळात सात्त्विक असतो.

इ. यांचे मन निर्मळ आणि बुद्धी प्रगल्भ असते.

ई. ती आचारधर्माचे पालन करतात.

 

३. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. ही बालके सात्त्विक व्यक्ती आणि संत यांच्याकडे त्वरित आकर्षित होतात.

आ. यांच्यात साधनेसाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण (उदा. दृढता, नम्रता, शिकण्याची वृत्ती) लहानपणापासूनच असतात.

इ. या बालकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातील गोष्टी समजतात.

ई. यांच्यामध्ये आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता असते.

Leave a Comment