गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले छत्तीसगडचे पू. चत्तरसिंग इंगळे (वय ८७ वर्षे)

छत्तीसगड येथील राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी होणा-या व्ययाविषयी ते आम्हाला सातत्याने विचारणा करत होते. ते आम्हाला सांगत, ‘‘तुम्हाला काहीही न्यून पडल्यास मी पैसे देतो. अधिवेशनासाठी व्ययाचा विचार करू नका. देव आपल्याला देणार आहे.’’

सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या सोलापूर येथील पू. (श्रीमती) मंगळवेढेकरआजी (वय ७८ वर्षे) !

जे शिष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, त्या शिष्यवत्सल गुरुमाऊलीच्या आणि शारीरिक स्थिती चांगली नसूनही गुरुसेवेची तळमळ असणा-या पू. (श्रीमती) मंगळवेढेकरआजींच्या चरणी अनंत कोटी दंडवत !

भोळा भाव, निर्मळ मन आणि प्रीतीचा सागर असलेल्या सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ८२ वर्षे) !

‘पू. आजींना कुणीही काहीही सांगितले, तरी त्या तत्परतेने आज्ञापालन करतात. त्या नेहमी इतरांच्या इच्छेप्रमाणे वागतात. त्यांना काही करायचे असेल, तर विचारून करतात. एखादी गोष्ट सांगितली, तर त्या सहजतेने स्वीकारतात.

अखंड शिकण्याच्या स्थितीत राहून परात्पर गुरुदेवांचे आज्ञापालन करणारे सद्गुरु सत्यवान कदम !

आमच्या घरात कुलाचाराचे पालन केले जायचे. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी आदी सण-उत्सव साजरे होत असत. वडील गावातील ‘आरेश्‍वर मंदिरा’त शंकराची पूजा करायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये (संतांच्या हस्तलिखितांचे आध्यात्मिक महत्त्व)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या को-या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामधील चैतन्य दोन्ही बाजूंनी प्रक्षेपित होऊन कमाल स्तरावर कार्यरत झाल्याने त्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आहे.

मुलांना व्यावहारिक गोष्टींमध्ये न अडकवता त्यांना साधनेत प्रगती करण्याची प्रेरणा देणारे आणि उतारवयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सेवा करणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप !

‘मनात केवळ साधनेचे विचार असावेत’, यासाठी बाबांनी वर्ष २०१५ मध्ये आमचे नाशिकचे घर आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची गावाकडील शेती विकली.

‘निरपेक्ष प्रेम’ हा स्थायी भाव असल्याने ‘सनातनच्या साधकांची आई’ झालेल्या सनातनच्या ४९ व्या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई, ठाणे

आजवर वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटलेली आई आता मात्र परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप झाली आहे. सनातनची संत झाल्यावर आमची आई ही ‘सनातनच्या सर्वच साधकांची आई’ झाली आहे.

आनंदी, प्रेमळ आणि इतरांचा विचार करणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९५ वर्षे) !

एक दिवस मी सहजच पू. आजींच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांनी मला त्यांची वेणी घालायला सांगितले. मी त्यांची वेणी घातली. मला त्यांचे केस रेशमासारखे मऊ लागत होते.

सनातनच्या १५ व्या सद्गुरु श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. आजी वयोमानामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्या दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातील माहिती लक्षात ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रबरी चपलांच्या आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्यांचा अभ्यास (संतांच्या पादुकांचे आध्यात्मिक महत्त्व)

अध्यात्मशास्त्रानुसार उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांच्या (गुरूंच्या) देहाच्या विविध भागांपैकी त्यांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते.