गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले छत्तीसगडचे पू. चत्तरसिंग इंगळे (वय ८७ वर्षे)

 

१. निवासस्थानी सेवाकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे

‘पू. इंगळेकाका यांचे छत्तीसगड येथे दोन मजली निवासस्थान आहे. ते दुसर्‍या माळ्यावर रहातात आणि तळमजल्यावर त्यांचा मुलगा कुटुंबासह रहातो. पू. काकांना तीन मुले असून त्यांचा एक मुलगा पुणे येथे नोकरी करतो. दुसरा मुलगा छत्तीसगड येथे अन्य ठिकाणी रहातो.

पू. इंगळेकाकांच्या निवासस्थानी छत्तीसगड येथील सेवाकेंद्र आहे. प्रसारानिमित्त आलेले साधक आणि संत या ठिकाणी निवासाला असतात.

२. दिनक्रम

पू. काका सकाळी लवकर उठून ध्यानमंदिरातील देवतांची पूजा करतात. ते सकाळी स्वतः चहा बनवून घेतात. त्यांची दोन मुले त्यांना सकाळचा अल्पाहार आणि दोन वेळचे जेवण देतात.

३. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान

पू. इंगळेकाका शासकीय आय.टी.आय.मध्ये प्राचार्य होते. त्यांना समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान आहे.

४. गुरुकार्याची तळमळ

४ अ. ‘छत्तीसगड राज्यात प्रसारकार्य वाढावे’, ही इच्छा असणे

‘प्रसारानिमित्त साधकांनी अन्य राज्यांतून येऊन त्यांच्या निवासस्थानी रहावे. ‘छत्तीसगड राज्यात प्रसारकार्य वाढले पाहिजे. साधकांनी येऊन संपूर्ण शहरात प्रसार करावा’, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करायला त्यांची सिद्धता आहे.

४ आ. ‘राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन चांगले व्हावे’, असे वाटणे

छत्तीसगड येथील राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी होणार्‍या व्ययाविषयी ते आम्हाला सातत्याने विचारणा करत होते. ते आम्हाला सांगत, ‘‘तुम्हाला काहीही न्यून पडल्यास मी पैसे देतो. अधिवेशनासाठी व्ययाचा विचार करू नका. देव आपल्याला देणार आहे.’’

छत्तीसगड येथील साधकांना त्यांचा आधार वाटतो. साधक पू. काकांना साधनेतील अडचणी विचारून त्यांचे मार्गदर्शन घेतात.

५. पू. काकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव आहे. त्यांचे नाव घेतल्यावर पू. काकांची भावजागृती होते.

६. पू. काकांमुळे त्यांच्या नित्य वापरातील वस्तूंमध्ये झालेले पालट !

अ. पू. काका वापरत असलेल्या वस्तूंमध्ये पालट झाला आहे.

आ. त्यांच्या खोलीतील संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात पालट झाला असून त्यात निर्गुण तत्त्व असल्यामुळे ते फिकट झाले आहे.

इ. सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चित्रातील पांढरेपणा वाढला असून त्यांच्यात निर्गुण तत्त्व आले आहे.’

– श्री. सुनील घनवट (२१.७.२०१८)