भोळा भाव, निर्मळ मन आणि प्रीतीचा सागर असलेल्या सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ८२ वर्षे) !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. पू. आजी स्थिर, शांत आणि आनंदी असतात.

१ आ. सातत्य

पू. आजी उपायांची चित्रे नियमित पालटतात. देवपूजा करणे, तुळशीला पाणी घालणे, या कृती त्या नियमित करतात. यामध्ये कधीच खंड पडलेला नाही.

– भुकन कुटुंबीय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ इ. निर्मळ मन

‘पू. आजींचा स्वभाव साधा-भोळा आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांची निर्मळता लक्षात येते. त्या नेहमी निरपेक्ष असतात.’ – श्रीमती इंदुबाई भुकन (मुलगी)

१ ई. परेच्छेने वागणे

‘पू. आजींना कुणीही काहीही सांगितले, तरी त्या तत्परतेने आज्ञापालन करतात. त्या नेहमी इतरांच्या इच्छेप्रमाणे वागतात. त्यांना काही करायचे असेल, तर विचारून करतात. एखादी गोष्ट सांगितली, तर त्या सहजतेने स्वीकारतात. ‘स्वतःकडे न्यूनपणा घेणे’, हा गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाला.

१ उ. लहान मुलांच्या समवेत लहान होऊन खेळणे

पू. आजी कु. वेदश्रीसमवेत (पणतीच्या समवेत) भातुकलीचा खेळ खेळतात. वेदश्री सांगेल तसे त्या करतात. त्यांचा खेळ पाहून आमची भावजागृती होते. त्या वेळी ‘आपणही लहान व्हावे’, असे आम्हाला वाटते. लहान मुलांच्या समवेत लहान होऊन खेळणे त्यांना सहज जमते.’ – भुकन कुटुंबीय

१ ऊ. प्रेमभाव

१ ऊ १. ‘कुणी रुग्णाईत असेल, तर त्या त्यांना जमेल तितके साहाय्य करतात.’ – श्रीमती इंदुबाई भुकन

१ ऊ २. ‘मी पू. आजींच्या बाजूच्या खोलीमध्ये निवासाला आहे. मी त्यांच्याकडे दोन दिवस गेले नाही किंवा त्यांना दिसले नाही, तर त्या स्वतः माझ्याकडे येतात आणि माझी विचारपूस करतात.’ – सौ. मनीषा गायकवाड (नात)

१ ऊ ३. त्रास असणार्‍या साधकांची विचारपूस करणे

‘पू. आजी म्हणजे प्रेमाचा सागरच आहेत’, असे आम्हाला वाटते. त्या काही दिवस रामनाथी आश्रमात निवासाला होत्या. तेव्हा काही साधकांना आध्यात्मिक त्रास होत असलेला पाहून त्यांना पुष्कळ वाईट वाटायचे. नंतर त्या बाहेर निवासाला गेल्या. त्या आश्रमात आल्यावर त्रास असणार्‍या साधकांना भेटतात आणि त्यांची विचारपूस करतात.’ – श्री. दामोदर आणि सौ. मनीषा गायकवाड (नातजावई आणि नात)

१ ऊ ४. खाऊ सर्वांना मिळाल्याची निश्‍चिती करून नंतर स्वतः घेणे

‘पू. आजींना काही पदार्थ खाण्यास दिला, तर ‘तो पदार्थ सर्वांना मिळाला आहे ना ?’, याची त्या निश्‍चिती करतात. नंतरच तो पदार्थ स्वतः घेतात. घरातील एखादा सदस्य उपलब्ध नसेल, तर पू. आजी त्याच्यासाठी तो पदार्थ काढून ठेवायला सांगतात. ‘परात्पर गुरुदेवांनी दिलेला खाऊ अधिकाधिक साधकांना कसा देता येईल ?’, यासाठी त्या प्रयत्नरत असतात.

१ ए. कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देणे

पू. आजी आम्हा कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात. त्या सर्वांना सांगतात, ‘‘चांगली साधना करा. परात्पर गुरुदेव सांगतात तसेच करा. लवकर लवकर संत व्हा.’’ – श्रीमती इंदुबाई भुकन

१ ऐ. ‘त्या सतत साक्षीभावात असतात.’ – भुकन कुटुंबीय

१ ओ. पू. आजींचा सतत आतून ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप चालू असतो’, असे त्या सांगतात.’ – सौ. उर्मिला भुकन (नातसून)

१ औ. परात्पर गुरुदेवांविषयीचा कृतज्ञताभाव

‘प्रत्येक गोष्ट परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मिळत आहे’, असे त्या सांगतात आणि हे सांगतांना त्यांचा कृतज्ञताभाव जाणवतो.’ – श्रीमती इंदुबाई भुकन

२. पू. आजींमध्ये जाणवलेले पालट

२ अ. मायेची ओढ उणावल्याचे जाणवणे

‘पूर्वी पू. आजींना गावी गेल्यानंतर ‘नातेवाइकांनी भेटायला यावे किंवा स्वतः नातेवाइकांकडे जावे’, असे पुष्कळ वाटायचे; परंतु आता त्या गावी गेल्या, तरी त्यांची कुठल्याही नातेवाइकाविषयी ओढ दिसली नाही किंवा ‘कुणाला भेटायला जाऊया’, असेही त्या म्हणाल्या नाहीत.’ – श्रीमती इंदुबाई भुकन

२ आ. ‘पूर्वी पू. आजी गावाकडील गोष्टी अधिक बोलायच्या; पण आता त्या आश्रमातील साधक आणि आश्रमातील इतर विषय यांवरच बोलत असतात.’ – सौ. मनीषा गायकवाड

३. पू. आजींविषयी आलेल्या अनुभूती

३ अ. पू. आजींनी तुळस लावायची असल्याचे सांगणे, एके ठिकाणी दिसलेले तुळशीचे रोप उपटण्याचा प्रयत्न केल्यावर ते उपटले न जाणे आणि तुळशीमातेला ‘पू. आजी तुझी सेवा करणार आहेत. तू चल’, असे प्रार्थना केल्यावर रोप मुळासकट उपटले जाणे

‘काही दिवस मी पू. आजींच्या सेवेसाठी त्यांच्या समवेत होते. त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘‘आपल्याला तुळस लावायची आहे.’’ मी तुळशीचे रोप लावण्यासाठी माती आणि कुंडी मिळवली. एके ठिकाणी मला तुळशीचे रोप दिसले. मी ते उपटण्याचा प्रयत्न केला; पण काही केल्या ते तुळशीचे रोप मला उपटता येत नव्हते. त्या वेळी मी तुळशीमातेला प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णप्रिये तुळशीमाते, तू माझ्या समवेत चल. मी तुला न्यायला आले आहे. तिकडे पू. आजी तुझी सेवा करणार आहेत. त्या तुला एका कुंडीत लावून प्रतिदिन त्यांच्या हातांनी तुला जल अर्पण करणार आहेत. तुला प्रतिदिन हळदी-कुंकू लावणार आहेत. कृपा करून तू चल.’ ही प्रार्थना केल्यानंतर लगेच तुळशीचे रोप एकही मूळ न तुटता उपटले गेले. तेव्हा ‘संत हे देवाचे सगुण रूप असतात’, हे माझ्या लक्षात आले.

३ आ. पू. आजींनी लावलेले तुळशीचे रोप टवटवीत दिसणे आणि पू. आजी तुळशीला पाणी घालत असल्याने ती आनंदी असल्याचे जाणवणे

नंतर ते तुळशीचे रोप पू. आजींनी कुंडीत लावले. तेव्हा ते जराही सुकलेले नाही. ते टवटवीत दिसतेे. प्रतिदिन पू. आजी तुळशीला पाणी घालतात. त्यामुळे ‘तुळस पुष्कळ आनंदी आहे’, असे मला वाटते. ‘देव संतांची इच्छा कशी पूर्ण करतो’, हे माझ्या लक्षात  आले.’ – सौ. उर्मिला भुकन

३ इ. पू. आजींच्या सेवेत अधिक आनंद मिळणे आणि भावजागृती होणे

‘पू. आजींच्या सेवेत मला आता अधिक आनंद मिळतो. ‘त्यांची सेवा अधिकाधिक कशी करू ?’, असे विचार माझ्या मनात येतात. त्यांच्या सेवेत असतांना मला कृतज्ञता वाटते. त्यांची सेवा करतांना माझी भावजागृती होते.’ – श्रीमती इंदुबाई भुकन

३ ई. ‘पूर्वीच्या तुलनेत त्यांच्या खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवते.’ – सौ. मनीषा गायकवाड

३ उ. ‘पू. आजींनी डोक्यावरून हात फिरवल्यावर डोक्यातील जडपणा न्यून होऊन मला हलकेपणा जाणवतो. त्यांच्या स्पर्शामध्ये मला पुष्कळ प्रेम जाणवते.’ – श्रीमती इंदुबाई भुकन

३ ऊ. पू. आजींच्या जपमाळेतून सुगंध येणे

‘पू. आजी वापरत असलेल्या जपमाळेतून सुगंध येत आहे. तो सुगंध घेतल्यानंतर हलके वाटून भावजागृती होते.

३ ए. पू. आजींच्या तोंडवळ्यावर आणि पलंगावर पुष्कळ वेळा दैवी कण दिसतात.’ – भुकन कुटुंबीय

३ ऐ. पू. आजींच्या वास्तव्यामुळे खोलीतील दाब उणावून खोलीत प्रसन्न वाटणे

‘आम्ही ज्या खोलीत रहातो, त्या खोलीत काही दिवसांपूर्वी पुष्कळ दाब जाणवत होता. ‘खोलीत थांबू नये’, असे आम्हाला वाटायचे. आम्हाला वाईट स्वप्ने पडायची; परंतु पू. आजी त्या खोलीत आल्यामुळे आता प्रसन्न वाटते. आम्हाला झोपही चांगली लागते.’ – श्री. दामोदर आणि सौ. मनीषा गायकवाड

४. पू. आजींना आलेल्या अनुभूती

४ अ. ‘पू. आजी नामजपाला बसल्यावर त्यांना परात्पर गुरुदेव बसलेले दिसतात.’ – श्रीमती इंदुबाई भुकन

४ आ. नामजप करतांना देवता, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

‘पू. आजी नामजप करायला बसतात, तेव्हा त्यांना श्रीकृष्ण, मारुति आणि दुर्गादेवी, या देवता समोर उभ्या राहिलेल्या दिसतात. काही वेळा गणपति त्यांच्यासमोर येतो. एकदा त्या झोपलेल्या असतांना त्यांना त्यांच्या पलंगाच्या बाजूला प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आलेले दिसले. ते त्यांच्या पलंगाजवळ उभे असलेले त्यांना दिसले.

४ इ. थकवा असतांना पू. आजींना समोर श्री गणेश दिसणे आणि त्या वेळी ‘श्री गणेश त्यांना प्राणशक्ती देण्यासाठी येतो’, असे वाटणे

‘पू. आजींना त्रास होत असतांना त्यांना सांगितलेले उपाय करण्याचा त्या प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना थकवा असतो, तेव्हा त्यांना त्यांच्या समोर श्री गणेश दिसतो. यावरून ‘श्री गणेश त्यांना प्राणशक्ती देण्यासाठी येतो’, असे आम्हाला वाटते.’ – श्री. दामोदर आणि सौ. मनीषा गायकवाड

४ ई. पू. आजी ध्यानमंदिरात उपायांना बसल्यावर दोन तेजस्वी बालके खेळतांना दिसणे, त्यांनी त्यांची नावे सिद्धू आणि ऋषी, अशी असल्याचे सांगणे आणि पू. आजींच्या गावातील देव सिद्धेश्‍वर अन् मांडवऋषी यांनी तेजस्वी बालकांच्या रूपात दर्शन दिल्याचे लक्षात आल्यावर पू. आजींची भावजागृती होणे

‘एकदा पू. आजी ध्यानमंदिरात नामजपाला बसल्या होत्या. त्या वेळी त्यांना समोर दोन तेजस्वी बालके खेळतांना दिसली. तेव्हा पू. आजींनी त्या बालकांना विचारले, ‘तुमचे नाव काय आहे ? तुम्ही कुठल्या गावचे ?’ त्यावर त्यांतील एक तेजस्वी बालक म्हणाले, ‘आम्ही पुष्कळ दूरवरून आलो आहोत. आम्ही तुमच्या गावचे आहोत. आम्ही तुम्हाला ओळखतो. आम्ही सगळीकडे फिरतो. आम्ही इकडेही सारखे येत असतो.’ पू. आजी म्हणाल्या, ‘तुमचे नाव काय ?’ त्यांतील एक जण म्हणाला, ‘माझे नाव सिद्धू’ आणि दुसरा म्हणाला, ‘माझे नाव ऋषि आहे.’ त्यानंतर ते गुप्त झाले. नंतर पू. आजींच्या लक्षात आले, ‘त्यांच्या गावी सिद्धेश्‍वराचे मोठे मंदिर आहे आणि तेथेच मांडवऋषीही आहेत. ‘तेच त्यांना भेटले आणि बोलले’, हे लक्षात आल्यावर त्यांची पुष्कळ भावजागृती झाली.

४ उ. रामनाथीला आल्यापासून देवांचे प्रत्यक्ष दर्शन होणे

त्या नेहमी म्हणतात, ‘‘पूर्वी मला देव कधी प्रत्यक्षात दिसत नव्हते; पण रामनाथीला आल्यापासून देव प्रत्यक्ष दिसतात. ध्यानमंदिरातही देवांची गर्दी न्यून झालेली दिसते. देव तेथे बसलेले नसतात, तर ते इकडे-तिकडे फिरत असलेले मला दिसतात.’’ – श्री. दामोदर आणि सौ. मनीषा गायकवाड

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे परात्पर गुरुमाऊली, ‘पू. आजींसारखे संत तुम्ही आमच्या घरात देऊन आमच्या कितीतरी पिढ्यांचा उद्धार केला आहे. त्याविषयी आम्ही आपल्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहोत. ‘देवा, पू. आजींची सेवा आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी करवून घ्या. ‘पू. आजींची सेवा परिपूर्ण कशी करू शकतो’, याचे चिंतन तुम्हीच आमच्याकडून करवून घ्या. त्यांच्या सेवेत माझ्याकडून आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या, त्याविषयी मला क्षमा करा’, अशी तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’ – श्रीमती इंदुबाई भुकन (७.७.२०१८)

 

पू. शेऊबाई लोखंडेआजी करत असलेल्या प्रार्थना !

१. समष्टीसाठीच्या प्रार्थना

‘पू. आजी त्यांच्या साध्या-भोळ्या शब्दांत प्रतिदिन समष्टीसाठी पुढील प्रार्थना करतात.

अ. सर्व साधकांना साधनेसाठी बळ मिळू दे.

आ. साधकांची प्रगती लवकर लवकर होऊ दे.

इ. परात्पर गुरुदेवांना अपेक्षित असे ईश्‍वरी राज्य येऊ दे.

२. परात्पर गुरुदेवांसाठीच्या प्रार्थना

पू. आजी देवाकडे परात्पर गुरुदेवांसाठी पुढील प्रार्थना करतात, ‘देवा, परात्पर गुरुदेवांना शक्ती मिळू दे. त्यांना निरोगी ठेव. पुढील कार्य करण्यासाठी त्यांना बळ मिळू दे.’

– श्रीमती इंदुबाई भुकन (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०१८)

Leave a Comment