मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !

हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.

आयुर्वेदाची अनमोल देणगी अनेक रोगांवर उपयुक्त औषधी !

आता जगामध्ये आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळत असतांना भारतियांनीही डोळे उघडून आयुर्वेदाचा पुरस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक रोगांवर उपयुक्त असणार्‍या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.

लहान मुलांसाठी वेखंडाचा उपयोग

लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.