चन्द्रामृत रस (गोळ्या)

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

चन्द्रामृत रस हे श्‍वसनसंस्थेला बळ देणारे औषध आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे श्‍वसनसंस्थेला बळ देणारे औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
अ. सर्व प्रकारचा खोकला दिवसातून २ – ३ वेळा १ ते ४ गोळ्यांचे चूर्ण पाव ते १ चमचा मधात मिसळून चाटावे किंवा केवळ तेवढ्या गोळ्या चघळून खाव्यात. ४ – ५ दिवस
आ. श्‍वसनसंस्थेच्या सर्व विकारांत श्‍वसनसंस्थेला बळ देण्यासाठी उपयुक्त दिवसातून २ – ३ वेळा १ – २ गोळ्यांचे चूर्ण अर्धा चमचा मधात मिसळून किंवा पाण्यासह घ्यावे. १ ते ३ मास

 

२. सूचना

अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात औषध घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

 

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

2 thoughts on “चन्द्रामृत रस (गोळ्या)”

    • नमस्कार,

      आम्ही औषधांची केवळ माहिती देतो. ही औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

      Reply

Leave a Comment