मूत्राशयाशी संबंधित विकारांवरील उपाय !

Article also available in :


१. लघवी होत नसल्यास

धने आणि गोखरू यांचा काढा तूप घालून द्यावा.

२. कष्टाने लघवी होत असल्यास

म्हणजेच मूत्रकृच्छ्रात दिल्या जाणार्‍या द्रव्यात गोखरू हे श्रेष्ठ द्रव्य आहे.

३. लघवीचे प्रमाण वाढल्यास

ओवा आणि तीळ एकत्र करून घ्यावेत.

४. मूतखडा

१. इंद्रजव चूर्ण तृणपंचमूल काढ्याबरोबर द्यावे.

२. कुळथाचा काढा + शरपुंखाचे चूर्ण २ ग्रॅम सैंधव घालून प्यावे.

३. गोखरूचे चूर्ण आणि मध मेंढीच्या दुधाबरोबर ७ दिवस प्यावे.

४. कुशावलेह : कुशमुळे, कासमूळ, उसाचे मूळ, शरमूळ, वाळा प्रत्येकी ४०० ग्रॅम घेऊन २० लिटर पाण्यात उकळून ५ लिटर राहीपर्यंत काढा करावा आणि त्यात काकडीचे बी, कोहळ्याचे बी, चिबुडाचे बी, ज्येष्ठमध, आवळा घालावा.

५. मूत्राशयाचे विकार, मूतखडा आणि प्रमेहनाशक

गुळवेलसत्त्व, वंशलोचन, वरुणाची साल, प्रियंगुसाल, वेलची, नागकेशर प्रत्येकी १ तोळा घालून त्याचा अवलेह करावा.

६. मूत्राशयांत सूज येऊन ताप आल्यास

धने आणि सुंठ यांचे पाणी प्यावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment