काविळीवरील आयुर्वेदाचे उपाय

Article also available in :

  • उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
  • अननसाचा रस घ्यावा.
  • आघाड्याच्या बिया रात्रभर ताकात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी वाटून ताकासमवेत घ्याव्यात.
  • काकमाचीचा स्वरस, मूर्वा क्षार, जवखार अन् चिंचेच्या क्षारासमवेत द्यावा.
  • कारल्याचा रस घ्यावा.
  • कुटकी आणि त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासमवेत घ्यावे.
  • पिकलेले केळे मधासमवेत खावे.
  • वाटलेला कोहळ्याचा पाला आणि हळदीची पूड दह्यातून खावी.
  • पांढरा कांदा, गूळ अन् थोडी हळद घालून सकाळी आणि रात्री खावा.
  • हरभर्‍याच्या डाळीच्या समप्रमाणात गूळ घातलेले पुरण ३ दिवस खावे.
  • १० ग्रॅम चिंचेची पाने आणि १० ग्रॅम रात्री भिजत ठेवलेली चण्याची डाळ पाण्यात वाटून ते पेय सकाळ-संध्याकाळ प्यावे.
  • चिंचक्षार आणि जवखार प्रत्येकी १ ग्रॅम घेऊन चण्याच्या पाण्यासह प्रतिदिन प्यावयास द्यावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment