बहुउपयोगी अनंतमूळ !

अनंतमूळ (सारिवा)

गुण : तिखट, मधुर, गुरु, स्निग्ध, शीतवीर्य, सुगंधी आणि त्रिदोषनाशक आहे.

अनंतमूळाची वेल १५ फूट लांबीची असते. त्याचे मूळ औषध म्हणून वापरतात. मराठीत याला ‘उपळसरी’ असेही म्हणतात.

 

उपयोग

रक्तशोधक आणि दुर्गंधनाशक आहे. रक्तस्रावावर उपयोगी. घाम आणि लघवी यांचे प्रमाण वाढवणारे, तसेच दाह आणि सूज न्यून करणारे आहे. विषनाशक आणि सर्व धातूतील आणि दुधातील दोष नाहीसे करणारे आहे. शुक्रवर्धक आणि रसायन आहे. ताप, त्वचेचे रोग, कंड, वातरोग, दाह, सूज, अतिसार, रक्तस्रावाची प्रवृत्ती, खोकला, दमा, वातरोग, आमवात यांवर उपयोगी.

१. अनंतमुळाचा फाण्ट

अनंतमूळ चूर्ण २० ग्रॅम + गरम पाणी १२० मिलिलिटर, ४० मिलिलिटर होईपर्यंत उकळून दिवसातून तीन वेळा द्यावे. कफप्रधान ताप आणि रक्तपित्तात प्रमेहातील व्रणांत उपयोगी.

अ. मूत्र रोगात लघवीला आग होणे, लघवीतून रक्त जाणे, यात अनंतमूळ, गुळवेल आणि जिरे यांचा फाण्ट घ्यावा.

आ. आमवात आणि संधिवात यासाठी अनंतमुळाचा फाण्ट घ्यावा.

२. अनंतमुळाचा काढा

अनंतमूळ चूर्ण २० ग्रॅम + ३२० मिलिलिटर पाणी घेऊन ८० मिलिलिटर होईपर्यंत उकळावा. ४० मिलिलिटर दिवसातून २ वेळा द्यावा. प्रमेह आणि प्रमेहातील पुटकुळ्यांवर उपयोगी.

३. अनंतमूळ सिद्ध तूप

रक्तशोधक जननेंद्रियांना बलदायक आणि रसायन. (मात्रा : १ ते ४ चमचे २ वेळा घ्यावे.)

४. सारिवा शुक्र आणि रक्तशोधक अन् प्रमेहावर उपयोगी

५. श्वास आणि दमा यांसाठी अनंतमूळ सिद्ध तूप घ्यावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment