‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते हेमंत ध्यानी यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

श्री. हेमंत ध्यानी (उजवीकडे) यांना ‘श्री गंगाजी की महिमा’ हा ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), ३१ जानेवारी (वार्ता.) – ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी २८ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी ‘राष्ट्र आणि धर्म’ याविषयी चर्चा केली. या वेळी ‘गंगा रक्षण’ विषयावर कार्य करणारे श्री. पुण्यानंदजी हेसुद्धा उपस्थित होते. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री. हेमंत ध्यानी यांना‘श्री गंगाजी की महिमा’ हा हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत हिंदी ग्रंथ भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment