सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

कुंभमेळा प्रयागराज २०१९

साध्वी डॉ. प्राची (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सौ. प्राची जुवेकर

प्रयागराज (कुंभनगरी) : सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले. ३१ जानेवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षणफलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर साधकांशी चर्चा करतांना त्या बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर यांनी साध्वी डॉ. प्राची यांचा सन्मान केला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते.

या प्रसंगी साध्वी डॉ. प्राची म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेने लावलेले प्रदर्शन पाहून चांगले वाटले. आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी, तसेच राष्ट्रामध्ये येत असलेल्या विसंगती दूर करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment