श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचा भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

हिंदु राष्ट्राचा जयजयकार करा ! – श्री क्षेत्र आप्पाचीवाडी
(कुर्ली) येथील भाकणुकीतून श्री हालसिद्धनाथांचा संदेश

श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांच्या मूर्तींसह १. पू. भगवान डोणे महाराज आणि भक्तगण यांचे आश्रमात आगमन होतांना

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – येणार्‍या भीषण आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी साधकांना आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचे २५ जानेवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता मंगलमय वातावरणात शुभागमन झाले.

श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव
यांची ढोलांच्या गजरात मिरवणूक आणि आश्रमप्रवेश

ढोलांच्या गजरात मिरवणुकीद्वारे श्री हालसिद्धनाथ देव आणिश्री विठ्ठल बिरदेव यांनी पारपतीवाडा येथून आश्रमाकडे प्रयाण केले. आरंभी ध्वज घेतलेला एक भक्त, ढोलपथक, भक्तगण, त्यामागे पाठीवर झूल आणि घोंगडे घालून सजवलेला देवाचा अश्‍व, त्यामागे छत्रधारी श्री हालसिद्धनाथ अन् श्री विठ्ठल बिरदेव यांच्या मूर्ती घेतलेले पुजारी आणि सर्वांत शेवटी आंबिलच्या ७ कळशा घेतलेल्या ७ सुवासिनी हे सर्व या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

आश्रमापासून दंडवत घालत घालत मिरवणुकीला सामोरे जात सनातनचे साधक श्री. अभिजीत विभूते यांनी श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांना ‘सनातनच्या आश्रमात यावे’, अशी विनवणी आणि प्रार्थना केली. यानंतर श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांसह भक्तांचे मंगलमय वातावरणात आश्रमात आगमन झाले.

श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. डोणे महाराज यांचे आश्रमात आगमन होतांना प्रवेशद्वाराशी सुवासिनींनी त्यांच्या चरणांवर जल घातले. देवाच्या अश्‍वाचीही पूजा करण्यात आली. या वेळी श्री हालसिद्धनाथांच्या भक्तांनी भावपूर्णरित्या आणि उत्स्फूर्तपणे ढोल अन् झांज या वाद्यांचा गजर केला.

ढोलवादन आणि पारंपरिक नृत्य यांतून वातावरणात चैतन्य अन् भाव यांची उधळण !

श्री हालसिद्धनाथांच्या मिरवणूकीपासून चालू झालेल्या ढोलवादनाने वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. ११ ढोल जोशात आणि देहभान विसरून वाजवण्यात येत होते. यामुळे वातावरणात भाव आणि चैतन्य पसरले होते. ढोलवादनातून वातावरणात चैतन्याची उधळण होत असल्याने साधकांना ‘भाव जागृत होणे’, ‘मन निर्विचार होणे’, अशा अनुभूती आल्या. देवांची पूजा आणि आरती झाल्यानंतर देवाला आळवण्यासाठी धनगर गाणी, समई नृत्य, गजी नृत्य, गोफ, भारूड, तसेच भजनसेवा सादर करण्यात आली.

भाकणुकीद्वारे श्री हालसिद्धनाथांनी दिलेला आशीर्वाद

१. सनातनच्या बाळांना हिंदु राष्ट्राचा आशीर्वाद द्यायला आलो !

२. तुम्ही हिंदु राष्ट्राचा जयजयकार करा !

३. गोव्यात एक दिवसाच्या विसाव्याला आलो आहे !

४. ही धर्माची गादी आहे ! तिला राम राम (नमस्कार) करा ! असा आशीर्वाद दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment