‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांची सनातन आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना सदिच्छा भेट !

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांनी १२ डिसेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना भेट दिली. त्यांनी येथे चालू असलेले आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रसार यांच्या संदर्भातील कार्य आस्थेने जाणून घेतले.

हिंदु राष्ट्रासाठी संघटित होणे हीच काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, राष्ट्रीय वारकरी परिषद

सर्वांनी हिंदु धर्मासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी संघटित होऊन कार्य करणे, हेच ह.भ.प. पू. वक्तेबाबांना अपेक्षित आहे, असे मार्गदर्शन नगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या वारकरी अधिवेशनात ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्त्री यांनी मांडले.

सनातनच्या पूर्णवेळ साधकांविषयी अपसमज पसरवणार्‍या ज्योतिष्यांपासून सावध रहा !

‘सनातनच्या संपर्कात असलेले एक ज्योतिषी सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांविषयी पुढील प्रकारचे अपसमज पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जयपूर, राजस्थान येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

घरी राहूनही त्यांनी भाव वाढवला आणि आज त्यांनी संतपद गाठले आहे. आज ते पू. वीरेंद्र सोनी झाले आहेत.’’ हे ऐकताच सोनी परिवारातील सर्व सदस्य आनंदित झाले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर विभूतीच्या माध्यमातून ईश्वर प्रगट होऊन कार्य करतो ! – ह.भ.प. गणेश महाराज, देवद, पनवेल

नामाने पवित्रता येते; नामदिंडी गावाचा परिसर पुनित करते. प्रत्येक युगात अधर्म वाढला की, ईश्वर अवतार घेतो; परंतु कलियुग चालू होऊनही ईश्वराचा अवतार अद्याप झालेला नाही. अवतार होण्यासाठी प्रत्येक युगात भक्तांनी प्रार्थना केली आणि मग अवतार झाले. आता विविध संत, संप्रदाय आदी नाम, भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून कार्य करत आहेत; हे सारे अधर्माला थोपवून धरत आहेत.

संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

‘सनातन पंचांग २०२२’मध्ये राजमाता जिजाऊंचा तिथीनुसार १७ जानेवारी २०२२ असा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख योग्य असतांना जाणीवपूर्वक ‘तो दिनांकानुसार १२ जानेवारी २०२२ असा हवा’, असा कागांवा करत मराठा सेवा संघ, तसेच संभाजी ब्रिगेड पुरस्कृत फेसबूक पृष्ठांवर सनातनविषयी अपप्रचार आणि चिथावणीखोर पोस्ट करण्यात आल्या आहेत.

कार्तिक अमावास्या, म्हणजे ४.१२.२०२१ या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण

‘शनिवार, कार्तिक अमावास्या (४.१२.२०२१) या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

 ‘सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा आहे. सनातन धर्माचे वैज्ञानिक कार्य सनातनच्या आश्रमात होत आहे’, असे कौतुकोद्गार सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी काढले.

साधकांनो, एखाद्या साधकाचे नाव सांगून पैसे मागणार्‍या अनोळखी व्यक्तींपासून सतर्क रहा !

कुणी अनोळखी व्यक्ती घरी येऊन किंवा अन्य कुठेही भेटून किंवा भ्रमणभाष करून ग्रंथ आणि पंचांग वितरणाची रक्कम किंवा अन्य कोणत्या कारणास्तव पैसे मागत असेल, तर ते साधकांनी देऊ नयेत.

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

या प्रसंगी सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह अन्य साधकांनीही पू. आजींच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेतले. पू. आजींच्या पार्थिवावर २२ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मुलगा आणि सनातनचे साधक श्री. राजेश मंगळवेढेकर यांनी अंत्यसंस्कार केले.