
कराड – महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कराड’ या योजनेअंतर्गत नुकतेच ‘स्तनपान : एक वरदान’ या विषयावर महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सनातनच्या साधिका सौ. चैत्राली शुभम् वडणगेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रोहिणी ढवळे मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. या वेळी सौ. चैत्राली शुभम वडणगेकर म्हणाल्या, ‘‘निबंध स्पर्धेच्या पूर्वसिद्धतेसाठी मी सनातन संस्थेचा ‘आईचे दूध : भूलोकातील अमृत’ या ग्रंथाचा अभ्यास केला. या ग्रंथामधून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.’’

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !