छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपल्यालाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून हिंदूंनाही धर्मशिक्षण द्यावे लागेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

२०.११.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पति) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा मनावर परिणाम करून न घेता साधनेचे प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष द्यावे.

कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण

‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली ! – सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रगाथा ओघवत्या शैलीत लेखन आणि वक्तृत्व यांद्वारे मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची शक्यता

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधनाच्या कार्यासाठी छायाचित्रकांची (‘कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

विश्वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत, तसेच सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचेही छायाचित्रीकरण केले जात आहे. हे छायाचित्रीकरण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांसाठी हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.

पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

सनातनच्या साधकांनी घेतली दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची सदिच्छा भेट !

दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली.