विहिंपचे कोकण सहमंत्री अनिरुद्ध भावे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

विश्व हिंदु परिषदेचे कोकण सहमंत्री श्री. अनिरुद्ध भावे यांनी ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (श्रीरामाचे बालकरूप) मंगलमय प्रसाद देण्यासाठी ते आश्रमात आले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

अबू धाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’च्या उद्घाटन कार्यक्रमात सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सहभागी !

अबू धाबी – येथील वाळवंटात बांधण्यात आलेले आणि पश्‍चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झाले. मंदिराचे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मंदिराच्या वतीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण पाठवले होते.

‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने देशभरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सनातन संस्थेला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्व) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आळंदी (पुणे) येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सव निमि‌त्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले आशीर्वाद !

पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे दि. २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी दर्शन घेतले.

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप प्रतिदिन अधिकाधिक करा !

हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गडकोट मोहिमेसाठी जाणाऱ्या सांगली येथील धारकऱ्यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मिलिंद तानवडे, श्री. अनिल तानवडे, श्री. राजू पुजारी यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.

श्रीराम मंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

अयोध्येत उभारलेल्या भव्यदिव्य श्रीराममंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेमुळे अयोध्येतून साक्षात् श्रीरामाची स्पंदने भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर नियमित रूपात प्रक्षेपित होणार आहेत. हे एकप्रकारचे प्रभु श्रीरामाचे सूक्ष्मातील अवतरण आहे.