
‘धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून कार्य होण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’ !
थोडक्यात ‘ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ साधना आहे. यासाठीच ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आत्यंतिक तळमळ आहे. या तळमळीपोटी ते आजही प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रंथकार्यासाठी एकप्रकारे त्यांचा संकल्पच झालेला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसारख्या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून साधकांनीही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे. यासाठीच ग्रंथकार्यात सहभागी होऊन सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी. ज्यांना समाजामध्ये जाऊन समष्टी साधना करणे शक्य नाही, ते संकलन आणि भाषांतर या सेवा शिकून घरी राहूनही त्या करू शकतात. ग्रंथाची सेवा करणे हीसुद्धा परिणामकारक समष्टी साधना आहे.
संपर्क क्रमांक : ८१८०९६८६४०, (०८३२) २३१२६६४
इ-मेल : [email protected]
टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२१.६.२०२१)
लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्यांची आवश्यकता !
सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र...
राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे...
संगणक दुरुस्तीच्या अंतर्गत पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !