देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांद्वारे सतत लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी संत झाल्याचे ओळखल्यानुसार हिंदु अधिवेशनात ३१ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान झाल्याची घोषणा करण्यात आली !

‘स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष हे त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत’, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ३१ मे २०१९ या दिवशी केली होती.

सौ. कृष्णा रवींद्र घोष

पतीच्या खांद्याला खांदा लावून निडरपणे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या आणि धर्माचरणी असलेल्या पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याचीही घोषणा करण्यात आली होती.

१. उपचार पूर्ण झाल्यावर बांगलादेश येथे जाऊन हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील होण्याविषयी कटिबद्ध !

कंमरेला दुखापत झाल्यामुळे सलग तिसरे शल्यकर्म करण्यासाठी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पू. रवींद्र घोष यांच्याकडे पाहून ‘ते सकारात्मक आणि स्थिर आहेत’, असे जाणवले. प्रत्यक्षात चालता येत नसले, तरीही ते आनंदी आहेत. शारीरिक त्रास असूनही बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी सतत कृतीशील आहेत. ‘शल्यकर्म आणि उपचार पूर्ण होताच बांगलादेशाची राजधानी ढाका येथे जाऊन तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी लगेच कृतीशील होण्यासाठी ते नियोजन करत असून त्यासाठी ते कटीबद्ध आहेत’, असे त्यांच्या बोलण्यातून वारंवार लक्षात आले. अलीकडेच तेथील हिंदूंवरील आक्रमणे वाढली असल्याने अनेक मार्गांनी तेथील हिंदूंना साहाय्य कसे मिळेल ? या संदर्भात ते चिंतन करून तळमळीने प्रयत्नशील आहेत. याप्रसंगी पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी यांना प्रणाम सांगा’, असे आवर्जून सांगितले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची २-३ वेळा आठवण काढून त्यांना ‘नमस्कार एवं प्रणाम सांगा’, असेही ते म्हणाले.

२. संघटन कार्यात निरपेक्षता

या भेटीच्या वेळी ते सर्व साधकांची विचारपूस करत होते. साधकांविषयी त्यांना किती आपुलकी वाटते, हे त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होते. पू. घोष यांना आर्थिक अडचणी असूनही ते सकारात्मक आणि स्थिर आहेत. ‘आर्थिक नियोजन करून प्राप्त परिस्थितीतही पुढील उपचारासाठी ते तत्पर आहेत’, असे ते म्हणाले. ‘अतिशय पारदर्शकतेने आणि निरपेक्षतेने संघटनकार्य करतांना पू. घोष हे किती निरपेक्ष आहेत, याचे दर्शन त्यांनी घडवून समस्त हिंदु संघटनांच्या परिवारासमोर एक आदर्श निर्माण केला आहे’, हे आम्हाला या वेळी लक्षात आले.

३. सतत वर्तमानकाळात राहून उत्साहाने परिस्थिती स्वीकारून पुढे वाटचाल करणे !

पू. घोष हे बांगलादेशातील हिंदु रक्षणाच्या ध्येयाने प्रेरित असल्याने ते सतत वर्तमानकाळात असून उत्साहाने परिस्थिती स्वीकारून पुढे वाटचाल करत आहेत. प्रत्यक्षात वयोवृद्ध असूनही स्वतःची साधना, अधिवक्तापदाची बुद्धीमत्ता, सकारात्मता, व्यापकत्व, प्रेमभाव, धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांमुळे ते आजही युवकांसाठी प्रेरणास्रोत अन् आदर्श धर्माभिमानी योद्धे आहेत. ‘हेच शिकण्यासाठी आमची भेट देवाने घडवून आणली आहे’, असे जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटली.

४. सतत अनुसंधान आणि हिंदूंच्या रक्षणासाठीची तळमळ

आम्ही पू. घोष यांना भेटलो, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. तो त्यांच्या मुखमंडलावरून ओसंडून वहात होता. एखादी व्यक्ती स्वतःचे सर्व आवरून कार्यालयात जात असतांना जशी उत्साही आणि नीटनेटकी दिसते तसाच उत्साह त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. प्रत्यक्षात आम्ही रात्री ९ वाजता त्यांची भेट घेतली होती. आम्ही त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला रुग्णालयात गेलो होतो. आम्ही विचारत होतो ‘कसली आहे शस्त्रक्रिया ? किती वाजता करणार ?’ ते या प्रश्नांची थोडक्यात उत्तर देऊन लगेच पुढे विचारायचे की, बांगलादेशमध्ये पुष्कळ अत्याचार चालू आहेत; पण तुम्ही माझ्या बातम्या वाचता का ? मी सर्व पाठवत असतो. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात का ? त्या बातम्यांचे कसे होते ? सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणांच्या घटनांच्या संदर्भात आपल्याला परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची भेट घेता येईल का ?’, असे विविध प्रश्न ते प्रत्येक २ मिनिटांनी सतत विचारत होते. मध्येच ते थोडे थांबून परत ‘बांगलादेशमध्ये हिंदूंवर पुष्कळ अत्याचार चालू आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे.’ आम्हाला माहिती होते की, तिथे त्यांना काही आर्थिक अडचणी आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांनी कुठेही त्याविषयी अवाक्षरही काढले नाही. त्यांनी स्वतः तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या मुलाला सांगितले, ‘‘त्यांच्यासमवेत छायाचित्र काढ. त्यांना शेवटपर्यंत सोडायला जा.’’ त्यांनी त्यांच्या पत्नीची ओळख करून दिली. ते सातत्याने प्रत्येक २ मिनिटांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे नाव घेत होते. त्यांच्या मनात गुरुदेवांविषयी असलेली श्रद्धा आणि त्यांच्याविषयी असलेली कृतज्ञता ही त्यांच्या विविध कृती अन् शब्दांमधून सतत जाणवत होती. ते सतत अनुसंधान आणि कृतज्ञता या भावात होते.

ते रुग्णालयात उपचार घेत असूनही त्यांच्याकडून सतत प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्य लहरींच्यामुळे आम्ही एखाद्या देवळात आहोत, अशी प्रसन्नता आणि आनंद आम्हाला जाणवत होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकेक संत आपल्या सर्वांसमोर प्रकट करून ते गुरुतत्त्वाची शिकवण आपल्या सर्वांना कशी देत आहेत, हे जाणवून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती. संत आणि आध्यात्मिक अधिकारी ओळखून त्यांचा अधिकार अन् कार्य यांची ओळख जगाला करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आपल्या सर्वांच्यासाठी आणि समष्टीसाठी किती करत आहेत, हे समजून घेण्यासाठी हे सर्व घडले आहे, असे लक्षात आले अन् अपार कृतज्ञता वाटली.

– श्री. अभय वर्तक (सनातन संस्थेचे धर्मप्रचारक) आणि श्री. गिरीश पुजारी, नवी देहली.

Leave a Comment