सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे !

कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, निगवे, भुयेवाडी, हुपरी यांसह अन्य गावांमध्येही ५० हून अधिक देवालयांमध्ये साकडे घालण्यात आले. जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागातील मंदिराची स्वच्छताही करण्यात येत आहे. आतापर्यंत ३३ हून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे.

२० एप्रिलला होणारे सूर्य-ग्रहण भारतात दिसणार नाही !

या वर्षीचे २० एप्रिल या दिवशी पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळही मानण्याची आवश्यकता नसणार आहे.

धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी जन्माष्टमी महोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले ! !

आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरातील मूर्तीसाठी आणलेल्या शाळीग्राम शिळेचे भावपूर्ण पूजन !

अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग !’

सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी ‘प्राज्ञ’ पुरस्काराने सन्मानित !

हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ पार पडले !

सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.

कोपरखैरणे येथील सनातनच्‍या साधिका सौ. तनुजा यादव यांचा महिला दिन निमित्त गौरव !

या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मानचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीमती सुजाता ढोले यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद़्‍घाटन झाले.

गुरूंवरील दृढ श्रद्धा, भाव, उत्तम नेतृत्‍वगुण आणि प्रेमभाव या गुणांचा समुच्‍चय असणार्‍या पुणे येथील सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या १२३ व्‍या समष्‍टी संतपदी विराजमान !

सौ. मनीषा पाठक या अनेक शारीरिक त्रास असतांनाही अत्‍यंत तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिल्‍यानंतर सर्व साधक भावस्‍थितीत डुंबून गेले.

पुणे येथील थोर संत प.पू. श्रीकृष्‍ण कर्वेगुरुजी यांचा देहत्‍याग !

धार्मिक आणि ज्‍योतिषतज्ञ प.पू. श्रीकृष्‍ण कर्वेगुरुजी यांनी २२ फेब्रुवारीच्‍या मध्‍यरात्री २ वाजता वयाच्‍या ९६ व्‍या वर्षी देहत्‍याग केला. तळेगाव दाभाडे येथील निवासस्‍थानी त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.