देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ पार पडले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा (डावीकडे), दहा दिशांच्या अधिष्ठात्री देवतांचे प्रतीक असलेल्या कलशांची मांडणी (मध्यभागी), महर्षींची प्रतिमा (उजवीकडे)

देवद (पनवेल), १७ मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, तसेच सद्गुरु, संत आणि साधक यांच्या सर्व प्रकारच्या त्रासांचे निवारण व्हावे, यांसाठी सनातनच्या येथील आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ १६ मार्च या दिवशी सनातनच्या पुरोहितांच्या हस्ते पार पडले. सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते.

‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता. पूर्व दिशेची इंद्र, आग्नेय दिशेची अग्नि, दक्षिण दिशेची यम, नैऋत्य दिशेची निऋति, पश्चिम दिशेची वरुणदेवता, वायव्य दिशेची वायुदेव, उत्तर दिशेची कुबेर, ईशान्य दिशेची ईशान, उध्र्व(वर) दिशेची ब्रह्मदेव आणि अधः(खालच्या) दिशेची देवता अनंत या देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती, क्षेत्रपालपूजन आदी झाले. प्रार्थना आणि कृतज्ञता यांनी पूजनाची सांगता झाली.

Leave a Comment