
पुणे – पुणे जिल्ह्याचे अध्यात्मप्रसाराचे कार्य पहाणार्या आणि गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा, ईश्वरप्राप्तीचा दृढनिश्चय, उत्तम नेतृत्वगुण, प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्चय असणार्या सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या सनातनच्या १२३ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. सौ. मनीषा पाठक या अनेक शारीरिक त्रास असतांनाही अत्यंत तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिल्यानंतर सर्व साधक भावस्थितीत डुंबून गेले. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना पुष्पहार घालून आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याविषयी पाठवलेल्या संदेशाचे वाचन सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले. संदेश वाचनानंतर उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली. चैतन्यमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याचा आनंद सर्व साधकांनी ‘याची देही याची डोळा’ घेतला.
या सोहळ्यामध्ये सनातनचे बालसंत पू. वामन राजंदेकर आणि सनातनच्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. यासह पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे पती श्री. महेश पाठक आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी मुलगी कु. प्रार्थना पाठक, आई श्रीमती सुरेखा सरसर आणि बहीण सौ. मानसी उथळे, त्यांचे यजमान श्री. मयूर अन् मुलगी चि. शरण्या उपस्थित होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !