सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी ‘प्राज्ञ’ पुरस्काराने सन्मानित !

पैठण (संभाजीनगर) येथील ‘ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यास परीक्षा प्राज्ञ पुरस्कार’ वितरण सोहळा !

ह.भ.प. श्री योगीराज महाराज पैठणकर यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारतांना सौ. अपर्णा जोशी, समवेत ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर

पैठण (जिल्हा संभाजीनगर) – ऑनलाईन वारकरी परीक्षा अभ्यासक्रम हा विविध संत साहित्याचा ३ वर्षांचा ९ सत्रांचा अभ्यासक्रम वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीत पूर्ण झाला. हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प. श्री योगीराज महाराज पैठणकर (अध्यक्ष तथा मिशन प्रमुख) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी  संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर, संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज संस्थान, नाशिकचे विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती, तसेच काही परीक्षार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी यांनाही ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ. जोशी यांनी सांगितले की, वर्ष २०२० पासून दळणवळण बंदीमुळे हा कार्यक्रम आता आयोजित केला गेला. गुरुदेवांच्या कृपेने याही उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. हा पुरस्कार गुरुप्रसाद म्हणून स्वीकारला आहे.

Leave a Comment