सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले.

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे ! – श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.

पंच दशनाम महानिर्वाणी आखाड्याचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

गुजरात येथील पंच दशनाम महानिर्वाणी आखाडा आणि खोइसम गुजरात संप्रदायाचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा अवधेशाश्रम यांनी २८ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते हेमंत ध्यानी यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी २८ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी ‘राष्ट्र आणि धर्म’ याविषयी चर्चा केली.

प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला श्री अभिषेक महाराज यांची सदिच्छा भेट

दरबार श्री पिंडोंरी धामचे श्री अभिषेक महाराज यांनी २७ जानेवारीला येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.

सनातनचे कार्य चांगले आहे ! – श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास बापू

सनातनचे ग्रंथप्रदर्शन उत्कृष्ट असून सनातनचे कार्य चांगले आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्यातील राजकोट येथील अखिल भारतीय वैष्णव विरक्त संत महामंडळाचे श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास महाराज यांनी २७ जानेवारीला येथे केले.

सनातनमधील शिकवणीचा अनुभव घेऊन साधना केल्यास साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील ! – सुनील ठाकूर, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज (जिल्हा रत्नागिरी)

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे स्वीय्य साहाय्यक श्री. सुनील ठाकूर आणि कार्यकर्ते श्री. राजन बोडेकर यांनी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास नुकतीच भेट दिली.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला येथून जावेसे वाटत नाही ! – महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, कानपूर, उत्तरप्रदेश

महंत देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेले महंत श्री वैष्णुदास बिथान (बिहार) यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनच्या कार्याला माझेही सहकार्य असेल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल.

प्रयाग कुंभपर्वाच्या निमित्ताने ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचा व्यापक धर्मप्रसार !

कुंभक्षेत्र २५ कि.मी. विस्तीर्ण आहे. त्याच्या हृदयस्थानी म्हणजे संगमक्षेत्राजवळील मोरी मार्गाजवळ ‘सनातन संस्थे’ला जागा मिळणे, ही केवळ गुरुकृपा होती.