प.पू. शांतीगिरी महाराज यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची प्रशंसा !

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला संतांचे आशीर्वाद !

प.पू. शांतीगिरी महाराज,

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने १० व्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजित करण्यात आले आहे. त्यांना टाळ्या वाजवून धन्यवाद देतो. भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न आहे. हा देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर विश्वगुरु बनू शकतो; कारण आपल्या देशात भारतमातेने अशा सुपुत्रांना जन्माला घातले आहे की, ज्यांच्या सामर्थ्याची आपण कोणतीही तुलना करू शकत नाही. प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे या भूमीवर अवतरित झाले अन् त्यांनी काय करून दाखवले, हे आपल्या समोर आहे. त्यामुळे ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आपल्या सर्वांना संघटित होऊन काम करायचे आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना जे कार्य करत आहे, त्याविषयी त्यांना कितीही शुभेच्छा दिल्या, तरी त्या अल्पच आहे. त्यामुळे आम्ही परत परत ईश्वर आणि भारतमाता यांना प्रार्थना करतो की, त्यांचे स्वप्न पूर्ण होवो आणि त्यांना प्रेरणाशक्ती मिळो.’ जय बाबाजी, जय भारत !

Leave a Comment