दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रमदर्शन केलेल्या हिंदुत्वनिष्ठानी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

 

१. रामनाथी आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१.अ. आज आश्रमात यायला मिळाले, हीच एक श्रेष्ठप्रतीची अनुभूती आहे.

– श्री. विनायक का. सावंत, श्री शिवाजी महाराज समितीचे सदस्य, सावंतवाडा, माजाळी, कारवार. (१२.६.२०२२)

१.आ. रामनाथी आश्रम पाहिल्यानंतर मंदिरात आल्यासारखे वाटले. आश्रम पहातांना आत्म्याला असे जाणवले की, ‘हिंदु राष्ट्र लवकरच येणार आहे.

– श्री. रोडमल रूपारामजी गहलोत, अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद, चंद्रपूर, महाराष्ट्र. (१२.६.२०२२)

 

२. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील
सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

२.अ. ईश्वराच्या सूक्ष्म दैवी सत्तेची साक्षात् अनुभूती घेण्याचे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे.

– श्री. प्रल्हाद शर्मा, गायत्री सदन, सिंधुनगर, प्रतापनगर चौराहा, मुरलीपुरा, जयपूर, राजस्थान. (१२.६.२०२२)

२.आ. सूक्ष्म-जगताविषयीची माहिती जाणून घेतांना आपल्याला आध्यात्मिक दृष्टी असणे आवश्यक आहे, याची जाणीव होते. ‘हा आश्रमाचा सर्वांत महत्त्वपूर्ण भाग आहे’, असे वाटले.

– श्री. विनायक का. सावंत, श्री शिवाजी महाराज समितीचे सदस्य, सावंतवाडा, माजाळी, कारवार. (१२.६.२०२२)

२.इ. जसे भगवान श्रीकृष्णाच्या वेळी कार्य होत होते (श्रीकृष्णावर सतत आक्रमणे होत होती.), तसेच येथे पाहिले. अशा आक्रमणांतून साधकांचे रक्षण होत आहे, ही आपल्या परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचीच कृपा आहे.

– श्री. रोडमल रूपारामजी गहलोत, अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद, चंद्रपूर, महाराष्ट्र. (१२.६.२०२२)

२.ई. प्रदर्शन पाहून जीवनात सर्वतोपरीने सावधगिरी बाळगण्याची प्रेरणा मिळाली. अध्यात्म मार्गावरून चालतांना ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्याशी लढण्याची ऊर्जा मिळाली.

– श्री. चक्रवर्ती सुलिबेले, वीरभद्रेश्वर थियटरजवळ, बसवेश्वर नगर, बेंगळुरू, कर्नाटक. (१२.६.२०२२)

२.उ. सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पाहून ‘डोळ्यांना दिसते, त्याच्या पलिकडेही काहीतरी असते’, याचे स्पष्टपणे दर्शन झाले.

– श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी, कागल, कोल्हापूर.

२.ऊ. सूक्ष्म-जगताविषयी इतर कुठेही माहिती मिळाली नाही, ती माहिती येथे मिळाली.

– अधिवक्ता जगदीश हाके, नांदेड, महाराष्ट्र. (१२.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

Leave a Comment