दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

 

रामनाथी आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. सात्त्विकता, सदाचार या गोष्टींची उच्च मूल्ये युवकांना विज्ञानाच्या माध्यमातून सांगण्याचे कठीण कार्य सनातन संस्थेने सहजतेने साध्य केले आहे !
‘रामनाथी आश्रम सौम्य, शांत आणि हृदयस्पर्शी वाटला. हिंदु धर्मातील शास्त्र (वैज्ञानिकता) जगभरात पोचवण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य आहे. सात्त्विकता आणि सदाचार या गोष्टींची उच्च मूल्ये युवकांना विज्ञानाच्या माध्यमातून सांगणे हे कठीण कार्य आहे. ज्या सहजतेने सनातन संस्थेने हे साध्य केले आहे, ते कौतुकास्पद आहे.’

– डॉ. भोलानाथ योगी, निर्देशक, हिंदु विद्यापीठ, नेपाळ.

२. ‘आश्रम पाहून माझे मन भारावून गेले. सनातनच्या साधकांची निष्ठा प्रेरणादायी आहे.’

– श्री. किशोरचंद्र गौतम, जिल्हा संयोजक, हिंदु राष्ट्र स्वाभिमान जागरण अभियान, नेपाळ.

३. ‘रामनाथी आश्रम पाहून छान वाटले. मन प्रसन्न झाले. साधक करत असलेली सेवा पाहून माझे मन उत्साहित झाले.’

– श्रीमती माया शर्मा, जिल्हा सदस्य, मातृशक्ती, नेपाळ.

– दिनांक ११.६.२०२२

. ‘आश्रमात भारतीय संस्कृतीची पूर्ण संकल्पना प्रत्यक्ष दिसून येते. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक यांचा अपूर्व संगम येथे स्पष्टपणे दिसून येतो. वर्तमानकाळात असा संगम असणे अतिशय आवश्यक आहे. आश्रमात दैवीशक्तीचा प्रभाव स्पष्टरूपात दिसून येतो.’

– अधिवक्ता भारत शर्मा, संरक्षक धरोहर बचाव समिती, राजस्थान

५. ‘स्वर्गासारखी आत्मनिर्भरता आणि आत्मकल्याण यांसाठी हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. साधना आणि सेवा यांसाठी आश्रम हे सर्वाेत्तम स्थान आहे. आश्रमाचे दिव्य वातावरण आणि साधकांची सेवाभावी वृत्ती संपूर्ण विश्वात पसरवण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत.’

– श्री. प्रल्हाद शर्मा, सचिव, माँ भगवती गायत्री ट्रस्ट, जयपूर, राजस्थान.

६. ‘दोन वर्षानंतर रामनाथी आश्रमात येण्याचा लाभ झाला. या वेळचा अनुभव पुष्कळच वेगळा आहे. आश्रमातील सात्त्विकतेचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. आश्रमाचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडत आहेत. आश्रम पहातांना असे वाटले की, मी मृत्यूलोकातून वैकुंठात आलो आहे. इथे साक्षात् भगवंतच गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रूपात वास करत आहे.’

– श्री. ईश्वर प्र. खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लश्कर ए हिन्द, मुंबई.

७. ‘माझे संपूर्ण शरीर रोमांचित झाले. असे जाणवले की, कोणती तरी दैवी शक्ती मला ओढत आहे.’

– श्री. सत्येंद्र द्विवेदी, प्रबंधक, रुद्रप्रयाग विद्या मंदिर, प्रयागराज, उत्तरप्रदेश.

– दिनांक १२.६.२०२२

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment