देहली येथे ज्योतिष समाधानपिठाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन

नवी देहली – येथील महाराजा अग्रसेन भवन, विकासपुरीमध्ये २४ एप्रिल २०१६ या दिवशी ज्योतिष समाधानपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेले प्रसिद्ध ज्योतिषी आणि अन्य मान्यवर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमध्ये झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

राजस्थान येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, शाळेतील मातृसंमेलन आणि पितृपक्षानिमित्त प्रवचन, इत्यादी उपक्रमांचा आढावा.

सनातन कार्य

अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही.

सनातनचे राष्ट्ररक्षणविषयक कार्य !

सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

समाजकल्याण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.

राष्ट्ररक्षण

राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राष्ट्रहितदक्ष नागरिकांनी आता स्वत:च्या रक्षणाबरोबरच राष्ट्राचे रक्षण करणेही गरजेचे बनले आहे. याच दृष्टिकोनातून सनातन राष्ट्रभक्ती वाढवणारे, आपत्कालीन मदत व अग्निशमन, प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग ठिकठिकाणी विनामूल्य आयोजित करते.’