सनातननिर्मित फ्लेक्स फलकांच्या प्रदर्शनाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील
रुक्मिणी पटांगण गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथील रुक्मिणी पटांगण गणेश मंडळाने सनातन-निर्मित फ्लेक्स प्रदर्शनाद्वारे धर्मप्रसार करून सहस्रो भाविकांपर्यंत धर्मशिक्षण पोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. मंडळाने गणेशोत्सवात लावण्यासाठी १० धर्मशिक्षण फलक प्रायोजित केले होते. हे फलक श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीच्या ग्रीलच्या बाहेरील बाजूस लावण्यात आले. चातुर्मासात येणारी एकादशी महत्त्वाची असते. त्यामुळे जवळपास १ लक्ष भाविक दर्शनाला येतात. प्रदर्शन लावण्यासाठी हिंदु महासभेचे पंढरपूर अध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे यांसह गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

अनेक भाविक गर्दीतही उभे राहून फलक वाचत होते. जवळपास २० सहस्र वारकरी आणि अन्य यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात