वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन ; सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी तहसील चौक, वणी येथे १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

श्राद्ध केल्याने पितरांना लवकर सद्गती प्राप्त होते – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवे. हे विधी आपल्या कुवतीप्रमाणे केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सुखसमद्धी लाभते, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रवचन

श्री गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील श्री साई रेसीडन्सी या संकुलामध्ये प्रवचन घेण्यात आले. जीवनातील तणावामागील विविध कारणे, तणाव दूर करण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया, आध्यात्मिक साधना आदींच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

गरोठ (मध्यप्रदेश) येथे ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण मालिकांचे प्रसारण

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने २४ ऑगस्टपासून येथील ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्था निर्मित ‘धार्मिक कृतीमागील शास्त्र’ आणि ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्र’ या मालिकांचे प्रसारण करण्यात येत आहे.

सनातन निर्मित ग्रंथांच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विहंगम धर्मप्रसार !

सनातन संस्थेने गणेशोत्सव आणि गणपति यांविषयीचे धर्मशास्त्र सांगणारे, तसेच अध्यात्मशास्त्रीय माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. गणेशोत्सवानिमित्त या सर्वच ग्रंथांना समाजातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा (जळगाव) येथे ‘आदर्श गणेशोत्सव साजरा’ !

चोपडा येथील राणी लक्ष्मीबाई गणेश मित्र मंडळाच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव’ हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या गणेशोत्सव मोहिमेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचा प्रसार

‘मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण हा अपप्रचार’ या मथळ्याखालील फलकही मूर्तीविसर्जनामुळे होणार्‍या कथित प्रदूषणाविषयीचा भ्रम दूर करणारा ठरला. या फलकांमुळे भाविकांमध्ये एकप्रकारे धर्मशिक्षणाचे बीज रोवले गेले.

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे महापौरांना निवेदन

हौदातील मूर्ती नंतर पुन्हा नदीत विसर्जन केल्या जातात किंवा त्या मूर्ती अयोग्य पद्धतीने हाताळणी अन् वाहतूक केल्या जातात.

कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी फलक प्रदर्शनाचे अनावरण !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सिद्ध केलेल्या धार्मिक फलकांचे प्रदर्शन येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी लावण्यात आले.

सातारा येथे गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

धर्माचरणी गणेशभक्तांनी कृत्रिम हौदाकडे पाठ फिरवत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णेच्या पवित्र संगमावर विधीवत् केले.