सनातनच्या वतीने पवई येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !

मार्गदर्शन करतांना सौ. नयना भगत

मुंबई – येथील पवई विहार संकुलातील शिवमंदिर येथे सनातनच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर २६ एप्रिल या दिवशी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत त्यांच्या प्रवचनात म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद हवा असतो. व्यावहारिक सुख हे अशाश्‍वत असते. शाश्‍वत आनंद मिळवण्याचा मार्ग केवळ अध्यात्मात आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार साधना करणे आवश्यक आहे.’’ या प्रवचनाचा २५ जिज्ञासूंनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment