भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्न वागणूक ! – अभय वर्तक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

बरायठा (सागर, मध्यप्रदेश) – आज संपूर्ण विश्‍वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंसमोर लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण अशा विविध समस्या आ वासून उभ्या आहेत. प्रत्येक समस्येचे मुळापासून निराकरण करायचे असल्यास हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. ते येथे युवकांच्या बैठकीला संबोधित करत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत सागर जिल्ह्यातील बरायठा येथे कथावाचक श्री. मधुसूदन मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. राजकुमार कौशिक यांच्या पुढाकाराने एक बैठक पार पडली. या वेळी २० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

 

हिंदुत्वाच्या क्षेत्रात साहित्य निर्मितीचे सनातन संस्थेचे कार्य मोलाचे !

अभाविपचे श्री. सुशांक भोजक आणि श्री. बघेले म्हणाले, ‘‘कम्युनिस्टांनी त्यांचे विचार पसरवण्यासाठी साहित्याचा पुष्कळ उपयोग केला. दुर्दैवाने हिंदुत्वाच्या क्षेत्रात आजच्या काळाला अनुसरून, कुतर्कांना उत्तर देणारे साहित्य अभावानेच सापडते. सनातन संस्थेनेे हे ग्रंथ निर्माण करून मोलाचे कार्य केले आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment