चेन्नई येथे अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान

चेन्नई – येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सनातनचे साधक श्री. के. बालाजी यांनी जिज्ञासू उद्योजक श्री. श्रीनिवासन् यांच्या साहाय्याने एका अनौपचारिक बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सनातनच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी साधनेचे महत्त्व सांगितले, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे महत्त्वही विशद केले.

श्री. कन्नन आणि श्री. श्रीनिवासन् यांनी श्री. के. बालाजी यांच्यासह गोव्यातील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली होती. या भेटीविषयी आनंद वाटून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आश्रमातील नियोजन, शिस्त आणि सकारात्मकता यांविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले. आश्रमातून परतल्यानंतर त्यांना काही अनुभूतीही आल्या आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment