तासगाव येथे धर्मप्रेमींसाठी झालेल्या साधना शिबिरांत सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन

कुमठे येथे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन ऐकतांना धर्मप्रेमी

तासगाव (जिल्हा सांगली) – तालुक्यातील तासगाव, कुमठे आणि जुळेवाडी या तीन गावांमध्ये धर्मप्रेमींसाठी साधना शिबिर घेण्यात आले. कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, याविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी तिन्ही शिबिरांतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचा लाभ ८५ धर्मप्रेमींनी घेतला.

विशेष – कुमठे येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे अनुभूती, तसेच कुटुंबियांमध्ये झालेले पालट सांगितले आणि शंकांचे निरसनही करून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment