आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

यावल (जळगाव) येथे साधना शिबिर उत्साहात पार पडले

जळगाव – आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे. आपले ध्येय काय असायला हवे ? किडामुंगीपासून प्रगत मानव प्राण्यापर्यंत प्रत्येक जण सुख कसे मिळेल ? यासाठीच धडपडत असतो; पण सुख कसे मिळवायचे ?, हे शाळा, महाविद्यालय यांमध्ये शिकवले जात नाही. आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते २५ सप्टेंबर या दिवशी आयोजित ‘एकदिवसीय साधना शिबिरात’ बोलत होते. या शिबिरात ४० युवकांसह १० पालकांनी सहभाग घेतला. मनुष्याचा जन्म पुन्हा पुन्हा होण्याची कारणे, जीवनात सुख-दु:ख का येतात ?, सकाम साधना आणि निष्काम साधना म्हणजे काय ?, साधनेतील गुरूंचे महत्त्व, काळानुसार साधना करण्याचे महत्त्व यांविषयीही सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment