भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील आध्यात्मिक पुस्तक मेळ्यात सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रंथ प्रदर्शनाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुवनेश्‍वर (ओडिशा) – येथे १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ‘गुंडीचा आध्यात्मिक पुस्तक मेळ्या’त सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये धर्माचरण, राष्ट्ररक्षण, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथ ठेवण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला.

ग्रंथ खरेदी केल्यावर एका जिज्ञासूने सांगितले, ‘‘तुमचे ग्रंथ पुष्कळ आकर्षक आणि उपयोगी आहेत. हे ग्रंथ कर्मकांड करणार्‍या ब्राह्मणांसाठी उपयुक्त आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment